आजाद समाज पार्टीचे आरोग्य शिबीर व बिरसा, फुले, आंबेडकरी जलसा यशस्वीरित्या संपन्न…

ऋषी सहारे 

  संपादक

गडचिरोली :- आजाद समाज पार्टी शाखा पोटेगाव च्या वतीने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

           यामध्ये दात व मुख तपासणी करीता प्रसिद्ध डेंटिस्ट डॉ. अंकिता धाकडे, नेत्र तपासणी करीता डॉ. मेघा ठेंगणे तसेच General तपासणी करीता डॉ. मनीषा नागफासे, प्रणाली ठेंगणे आदी चमू उपस्थित होती.

     यावेळी परिसरातील असंख्य नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

          त्यानंतर रात्री धमाकेदार व क्रांतिकारी गीतांचा जलसा आयोजित करण्यात आला होता. 

        यावेळी आजाद समाज पार्टीचे तमाम पदाधिकारी उपस्थित होते.

           जिल्हा प्रभारी धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा कार्याध्यक्ष विनोद मडावी, गडचिरोली तालुकाध्यक्ष प्रा.नरेश मोहुर्ले, विधानसभा प्रभारी धनराज दामले यांचे नेतृत्वात आयोजन करण्यात आले होते.