उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक..
चिमूर पोलिसांनी कुमार लखन अंबादास पोईनकर यांच्या घातपात-अपघात मृत्यू प्रकरणाकडे सुरुवाती पासूनच दुर्लक्ष केल्यामुळे,चिमूर पोलिसांनी घातपात – अपघात करणाऱ्यांना बिनधास्त सहकार्य केले आहे याची जाणीव कुटूंबातील सदस्यांना झाली होती.
यामुळे कुमार लखन अंबादास पोईनकर यांच्या नातेवाईकांना चिमूर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय येऊ लागला होता.
याचबरोबर चिमूर पोलिस हे ट्रॅक्टर मालक सुमीत पालकदास बोरकर,ट्रॅक्टर चालक चंद्रशेखर नारायण तुमराम,आणि इतर मजूरांना वाचिविण्यासाठीच काम करीत असल्यांचा विश्वास अपघातातंर्गत मृतकाचे मोठे भाऊ देवानंद अंबादास पोईनकर यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांत बढावला.
यामुळे देवानंद अंबादास पोईनकर यांच्यासह नातेवाईकांना चिमूर पोलिसांवर कवळीचा विश्वास राहिलेला नव्हता.
म्हणूनच मोठा भाऊ देवानंद अंबादास पोईनकर यांनी,कुमार लखन अंबादास पोईनकर घातपात-अपघात प्रकरणाची चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे पोस्ट आॅफीस रजिस्टर द्वारे तक्रार पाठविली आहे.