प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
अखेर आज भारताचे गृहमंत्री श्री.अमीत शहा यांच्या विरुद्ध अट्रासिटीचा कलम ४ व भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चां कलम ३०२,३५२, व IPC कलम १२० ब,१५३ अ,ब,क,२९८,५०४,५०५(अ),५०५(२) नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी वरोरा पोलिस ठाण्यात गंभीर रिपोर्ट संविधानाचे अभ्यासक विनोदकुमार खोब्रागडे यांनी दाखल केली.
फिर्यादी संघर्षी आयु.विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक आहेत.ते चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत,तालुक्याचे ठिकाण असलेल्या वरोरा येथे वास्तव्यास असून त्यांनीच केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्या विरोधात गंभीर रिपोर्ट दाखल केली आहे.
या देशाचे कायदे पंडीत,ज्ञानाचे प्रतीक,करोडो करोडो समाज बांधवांचे देवापेक्षा ही देव असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल संसद मध्ये,”भारतीय संविधानावर दोन दिवस डिबेट सुरू असतानां,दिनांक १८/१२/२०२४ रोजी,”एकेरी शब्दात आंबेडकर,आंबेडकर,आंबेडकर,आंबेडकर,आंबेडकर,आंबेडकर हे फॅशन झाले आहे.”देवाचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता,”असे बेताल वक्तव्य,जे त्यांनी आपल्या मनातील बोलुन, करोडो करोडो बौद्ध बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.तद्वतच देशातील तमाम नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत.
विनोदकुमार खोब्रागडे तक्रारीत म्हणतात,हे केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांचे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतचे वारंवार एकरी वक्तव्य सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी लाईव्ह दाखविल्या आहेत.यामुळे गृहमंत्री अमीत शहा यांनी बारबार एकेरी शब्द वापरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला आहे.
ते म्हणतात हे सर्व मी टिव्ही वर बघुन व्यथित झालोय, माझ्या सह करोडो बौद्ध बांधव व्यथित झाले व आंदोलन करणे,मोर्चा काढणे,निषेध नोंदविणे,निवेदन देने सुरू केले.
ते तक्रारीत म्हणतात,केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्या या बेताल वक्तव्या मुळे वायुसेना,स्थलसेना,नौसेना यांचे काम करीत असताना मन विचलित केले आहे,धर्म,वंश,जात,भाषा निवास,गटागटामध्ये शत्रुत्व निर्माण केल्यामुळे,राष्ट्रीय एकात्मतेला बंधनकारक असे कृत्य केले आहे,धार्मिक भावना दुखावल्या आहेत,सार्वत्रिक आगळीक निर्माण केली आहे,शांतता भंग केली आहे,दोन समाजात शत्रुत्व निर्माण केले आहे,असभ्य एकेरी मनातील भाषा संसदेत वापरून,सर्व इलेक्ट्रॉनिक मिडियांच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आले व हा दखलपात्र गुन्हा आहे.
भारतीय संविधानातील अनुच्छेद १४ कायद्यापुढे सर्व समान आहेत मग,”PM,CM,DM,DC,CJI,
IAS,IPS,असो की कुणीही असो.
त्यांनी स्पष्ट केले की,आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.
आपला भारत देश भारतीय संविधानातील अनुच्छेद ७७ नुसार कारभार चालतो..
राज्य सरकार भारतीय संविधानातील अनुच्छेद १६६ नुसार कारभार चालतो…
या देशात देवा,धर्माला,मंदिर,मस्जित,विहार,गिरजा घर यांना सुद्धा न्याय व हक्क भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे.
सर्व श्रेष्ठ भारतीय संविधान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्षे,अकरा महिने सतरा दिवस एकट्याने मेहनत करून दिनांक २६/नोव्हेंबर/१९४९ ला भारतीय नागरिकांना अर्पण केले आहे,हे सर्वांनी लक्षात घ्यावे असे इतिहासीक घटनाक्रमांना अनुसरून तक्रारदार विनोद खोब्रागडे म्हणतात.
जर कुणी,”भारतीय संविधानाचे,राष्ट्रगीत,व राष्ट्रध्वजाचे,अवमान करेल त्यांचावर भारतीय संविधानातील अनुच्छेद ५१ क,का,नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो हे सुद्धा देशातील नागरिकांनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे,असाही संदेश त्यांनी शासन-प्रशासनासह देशातील नागरिकांना दिला आहे.
म्हणूनच भारतीय संविधानाचे संरक्षण करणे सर्व समाज बांधवांचे अधिकार व कर्तव्य आहे.
****
संघर्षी...
आयु.विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे..
जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तथा प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि RTI कार्यकर्ते,राहणार वरोरा,जिल्हा चंद्रपूर..
संपर्क क्रमांक:- ९८५०३८२४२६/८३२९४२३२६१