मी माझ्या माता – पित्याच्या पोटी जन्मलेलं एक निरागस बाळ आहे.जन्मताच निसर्गाने मला सदसदविवेक बुद्धी प्रदान केलेली आहे.या पृथ्वीतलावर अनेक सजीवांचा जन्म निसर्गाने घातला. त्यात प्राणी आणि वनस्पती हे दोनच प्रकार आहेत.
परंतू या दोन्ही प्रकारात निसर्गाने मला स्वतःसहित सदविचारी बनून इतरांच्याही हक्काचे संरक्षण करण्यासाठी तलख,निरागस आणि एकदम कोरा करकरीत मेंदू देऊन इतरांपेक्षा वेगळं अस्तित्व प्रदान करुन या पृथ्वीतलावर जन्माला घातलं.
थोडक्यात,संपूर्ण सजीव सृष्टीत मलाच झुकते माप देऊन माझ्यावर निसर्गाने कृपा केली. ती यासाठी की मी विज्ञानवादी + विवेकवादी = मानवतावादी बनून निसर्गनियमानुसार आचरण करुन संपूर्ण सजीवसृष्टीचे कल्याण करुन,निसर्गाच्या सानिध्यात राहून त्याच्या नियमानेच माझ्यासोबत सर्वांचा विचार करुन सर्वांचे कल्याण करणे हेच माझे नैतिक कर्तव्य असावे.हीच अपेक्षा कदाचित मला झुकते माप देण्यामागची असावी.
असा मी आहे!
ज्याला माणूस म्हणतात…
तोच मी केवळ भारताचाच नव्हे तर जगाचा नागरिक आहे.
“अवघे विश्वची माझे घर आहे.
—- संत ज्ञानेश्वर…
“असा मी आहे,याच नियमानुसार माझे मूलभूत नैतिक कर्तव्य आणि हक्क काय आहेत.म्हणजे मला स्वतःच्या आरशात पाहुन मी कोण आहे.हे ओळखण्यासाठी आज पासून एक वैचारिक लेखांची लेखमाला आपण सुरु करणार आहोत.
कारण या देशातील आज 2024 च्या काळातील देशाची व जगाची जनता अशी मानसिकदृष्ट्या सैरभैर का झाली?
सर्वकाही बदलण्याची आणि क्रांती करण्याची शक्ती तिच्यात असतांना,राष्ट्रीय आणि जागतिक तत्ववेत्ते आणि महापुरुषांची क्रांतीची संपत्ती सोबत असतांना,आम्हाला काय कुणाची भीती?
या सर्व कारणांचा,उपायांचा,वैचारिक पराभवांचा विचार करुन…..
मी कोण आहे?
या शीर्षकाखाली….
याचे संशोधन करणाऱ्या विचाराची लेखमाला उद्यापासून त्याची सुरुवात होणार आहे. तेंव्हा जास्तीत जास्त व्हायरल करुन सहकार्य करावे…
*****
आवाहनकर्ता
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर,7875452689