पिंपरी बुद्रुक येथील मारुती मंदिर या ठिकाणी लक्ष्मण शक्ती सोहळा उत्साहात संपन्न… — 200 हून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा आस्वाद….

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिहपुर प्रतिनिधी

         पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील मारुती मंदिर या ठिकाणी लक्ष्मण शक्ती सोहळा अनेक वाचक, सुचक व भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 

           सालाबाद प्रमाणे तिसऱ्यांदा लक्ष्मण शक्ती सोहळा उत्सव करीत असताना ग्रंथ वाचक सूचक भाविक भक्त महिला भगिनी व श्रोते शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.

              लक्ष्मण शक्ती सोहळ्या दिवशी मारुती मंदिरामध्ये संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजे पर्यंत रात्रभर ग्रंथाचे वाचन करून सकाळी पहाटे लक्ष्मण शक्ती सोहळा तोफा व फटाक्यांच्या आवाजात साजरी करण्यात आली.

             सर्वांच्या उपस्थित महाआरती करून सर्व राम भक्त व भाविक श्रोते यांना महाप्रसाद देण्यात आला. पिंपरी बुद्रुक, गणेशवाडी, गारअकोले, टाकळी, टणु , गिरवी, ओझरे , गोंदी ,सह सर्व वेगवेगळ्या भागातून आलेले वाचक सूचक व श्रोते शेकडो संख्येने उपस्थित होते.

            वाचक व सुचक म्हणून, गारआकुल्याचे ह भ प भोसले आबा,संदिपान पडळकर, बाळासाहेब घाडगे, वर्धमान बोडके, महादेव सुतार, अरुण सूर्यवंशी, आर्जुन पडळकर, नागनाथ काशीद, महेश सुतार, डॉ.शंकर बोडके, आधी भाविकांनी गेली पाच महिन्यापासून नित्यनेमाने मंदिरांमध्ये वाचक व सुचक म्हणून सर्व जबाबदारी पार पाडली.याबद्दलही सर्व भाविकांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त केले.