मागदा गावात पसरले अंधाराचे साम्राज्य… — ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष…

प्रितम जनबंधु

     संपादक 

            आरमोरी तालुक्यातील मानापुर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मौजा मागदा येथे रात्रीच्या सुमारास अंधारात वहिवाट करावी लागत आहे. पथदिवे पुर्णतः बंद अवस्थेत दिसुन येत आहेत परिणामी गावात अंधाराचे साम्राज्य पसरले असल्याचे दिसून येत आहे.

         मागदा वासीयांना अनेक अडचणीत वास्तव करावे लागत आहे. स्थानीक लोकांना रात्रीच्या सुमारास घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे.

              पथदिवे दुरूस्ती बाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला तक्रार व सुचना करुन वारंवार सांगण्यात आले असुनही ग्रामपंचायत प्रशासन मात्र निद्रावस्थेत असल्याचे दिसुन येत आहे.

           सदर गंभीर बाब लक्षात घेता ग्रामपंचायत प्रशासनाने सदर पथदीव्याची तातडीन दुरुस्ती करुन मागदा गावातील रस्ते प्रकाशमय करावे अशी मागणी होत आहे.