एसटी बस व दुचाकी वाहनाचा चिमूर ते वरोरा महामार्गावर अपघात.. — बाईकस्वाराची प्रकृती चिंताजनक,चिमूर उपजिल्हा रुग्णालयातून १० वाजता हलवले नागपूरला..

 

     रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी..

            चिमूर आगाराची एसटी बस मिनझरी मुरपार वरुन चिमूरला मार्गक्रमण करीत असताना लोखंडी पुलाजवळ बाईकस्वाराची व एसटी बसची समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान घडली.

          बाईकस्वार हे वरोऱ्याकडे जात होते.अपघातग्रस्त बाईकस्वारांची प्रकृती चिंताजनक असून,चिमूर उपजिल्हा रुग्णालयात डॉ.आनंद किन्नाके आणि त्यांच्या टीमने प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे.

        अपघातग्रस्त हे चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा हिरापूर येथील रहिवासी असून त्यांची नावे श्री.सोमेश्वर लक्ष्मण पंचवटे वय ४९,श्री.शरद शंकर आडे वय २५ वर्ष असे आहेत.

            अपघातग्रस्त एसटी बसचा क्रमांक एम.एच.३१,एफ.सी.३६९० असून बाईकचा क्रमांक एम.एच.३४,व्ही ४१४६ असा आहे.दोन्ही वाहने पोलिस स्टेशन चिमूर येथे जमा करण्यात आली आहेत.

           ३५३ ई या वरोरा ते चिमूर राष्ट्रीय महामार्गवर अपघात झाला असून अपघात स्थळ लोखंडी पुलाचा परिसर आहे.

        सदर ठिकाणच्या महामार्गावर खड्डे पडले असून घटनास्थळापासून अर्धा किलोमीटर पर्यंत मार्ग अरुंद आहे.