दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
अवैध वाळू उपसा प्रकरणातंर्गत आकाश सोनटक्के यांचे मृत्यू प्रकरण अतिशय गंभीर असून टॅक्टर मालकावर वाळू चोरीचा व मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार काय?हा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे.
नौकर व्यक्ती,मालक सांगतो त्याप्रमाणे काम करतो या सत्याचा व वास्तव्याचा विचार केल्यास केवळ टॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करुन प्रकरण तिथेच न थांबवता,टॅक्टर मालकावर सुध्दा अवैध वाळू उपसा प्रकरणातंर्गत चोरीचा आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे या मताची चिमूर तालुक्यातील जनता आहे.
चिमूर तालुक्यातंर्गत अवैध उत्खननाची प्रकरणे मोठ्या प्रमाणात सुरु असताना संबंधित विभागाचे अधिकारी मुंग गिळून गप्प बसले आहेत.त्यांच्या गप्प बसण्यावरच आता शंका येवू लागली आहे.
मात्र,अवैध उत्खननातंर्गत अधिकाऱ्यांनी चूप राहणे म्हणजे चिमूर तालुक्यातील नागरिकांचे नुकसान करणे होय.