युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
नजिकच्या नालवाडा येथे संत गाडगेबाबा यांची 67 वी पुण्यातिथी ग्रामविकास संस्थेच्या कार्यालयात पार पडली यावेळी गावातील जेष्ठ नागरिक व प्रगतीशील शेतकरी नारायण आप्पा बोडखे यांच्या हस्ते गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार डॉ.प्रकाश चिंचोळकर यांनी जनतेचे समाज प्रबोधन व जनजागृती करण्यासाठी सत्तेची गरज नाही हे गाडगेबाबा यांनी केलेल्या कार्यावरून सिध्द होते असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला गोवर्धन गावंडे, शिवा आप्पा बोडखे, संतोष पावडे,महेश आप्पा बोडखे, आशिष गावंडे, गजानन बोडखे, दिलीप खांडेकर, नाजुक खांडेकर, पूर्णाजी खांडेकर,विश्वास खांडेकर, मुकेश खांडेकर, संतोष आप्पा बोडखे, सदाशिव बोडखे, भाऊराव खांडेकर, संजु ढोके, विनायक धजेकर, अरुण भोंडे, रमेश ठाकरे, विश्वास डायलकर, गजानन खांडेकर व इतर गावकरी मंडळी उपस्थित होते.