युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
दर्यापूर पासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या लखापुर फाट्याजवळ मजुरांच्या ट्रॅक्टरला आमदार बळवंत वानखडे यांच्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने शेतकरी तथा सेवा सहकारी सोसायटी क्रमांक सहाचे अध्यक्ष मोहम्मद खालिक यांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य पाच जण मजूर जखमी झाले आहेत.
यातील दोन जण अती गंभीर जखमी असून त्यांना तातडीने अमरावती सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की दर्यापूर शहरातील एकविरा स्कूल ऑफ बिलियन मध्ये स्नेहसंमेलनात भेट देण्याकरीता आमदार यशोमती ताई ठाकूर या दर्यापूरला आल्या होत्या.यावेळी त्यांच्या समवेत आमदार बळवंत वानखडे व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.आमदार यशोमती ताई ठाकूर यांचा ताफा अमरावतीकडे रवाना होत असताना आमदार बळवंत वानखडे यांची गाडी त्यांच्याच मागे ताफ्यात मध्ये होती.
शेतीकरी असणारे मोहम्मद खाली हे आपल्या शेतामधील कापूस वेचून झाल्यावर त्यांच्याच ट्रॅक्टरमध्ये मजुरांना घेऊन दर्यापूरकडे येत असताना आमदार बळवंत वानखडे यांच्या गाडीने ट्रॅक्टरला जोरदार धडक मारली,सुदैवाने आमदार बळवंत वानखडे हे आमदार यशोमतीताई ठाकूर यांच्या गाडीत बसलेले होते.
आमदार वानखडे यांच्या गाडीत केवळ ड्रायव्हर होते.मजुरांच्या ट्रॅक्टरला आमदार बळवंत वानखेडे यांच्या गाडीने एवढी जबरदस्त धडक दिली होती की आमदार बळवंत वानखडे यांच्या गाडीचा अक्षरशः चूराडा झाला.
या अपघातात ट्रॅक्टरच्या समोर बसलेले शेतमालक महंमद खालीक म अमजद वय 55 वर्ष रा.शमीम आझाद शाळेजवळ दर्यापूर यांचा जागीच मृत्यू झाला असून मजुरांपैकी पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
१)श्री.सुरेश शामराव सावळे वय 50 समता नगर गंभीर,..२) सौ.विमाला बाई जानराव राऊत 50 टाटा नगर,..३) सौ.संगीता संजय नांदणे 35,..४) सौ.नीता उमेश सावळे 35,..५) श्री.संजय सुरेश इंगळे 55 सर्व रा. टाटा नगर दर्यापूर येथील रहिवासी असून अपघातातंर्गत गंभीर जखमी झाले आहेत.
मृत झालेले मोहम्मद खालीक हे दर्यापूर येथील सेवा सहकारी सोसायटी क्रमांक 6 चे अध्यक्ष आहेत.
अपघातातील जखमींना तातडीने दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना तातडीने अमरावती येथे रवाना करण्यात आले आहे.उर्वरित जखमींवर दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.