ब्रेकिंग न्यूज… सुमो पलटली,सुदैवाने जिवितहानी टळली..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

           वृत्त संपादीका

             घनदाट जंगलात असलेल्या मौजा सारंगड येथे मयतीच्या क्रियाक्रमा निमित्ताने जात असताना अडीच वाजताच्या दरम्यान चिमूर ते नेरी मार्गावर चारचाकी वाहन सुमो हे पलटी झाले असल्याची दुर्दैवी घटना घडली.

         शेगांव येथील काही व्यक्ती एम.एच.२६,,एल.१६६७ या क्रमांकाच्या सुमो चारचाकी वाहनाने मयतीच्या क्रियाक्रमा निमित्ताने आज मौजा सारंगड येथे जात असताना सुमोचा राड तुटल्याने अपघात झाला असल्याची माहिती पुढे आली आहे.

             चिमूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व पंचनामा करून जखमी व्यक्तींना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल करण्यात आले.

         वयोवृद्ध पुरुष व वयोवृद्ध महिला जखमी झाले आहेत.महिलेला गंभीर मार लागला असल्याचे वृत्त आहे.