नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली -सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक एकोडी येथे बहुजन परिवर्तन पॅनल च्या वतीने वॉर्ड क्रमांक 3 मधून अनुसूचित जाती आरक्षित जागे मधून कवी गायक ,वादक,संगीतकार भावेश कोटांगले हे मतदारांनी निवडुन दिलं.
भावेश हे प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटना भंडारा जिल्हा अध्यक्ष आहेत गेल्या 20 वर्षांपासून आपल्या गीत गायनाच्या माध्यमातून बहुजन समाजात जन्मलेल्या महापुरुषांची विचारधारा गीत गायनाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत
ऐवढच नव्हे तर कोरोना कालावधीत कलावंतांना न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चे,आंदोलन करून न्याय मिळवून दिला. हीच संकल्पना मनाशी बाळगून आपण ज्या गावात जन्मलो त्या गावासाठी काही तरी करता यावा यासाठी निवडणूक लढली व मतदारांनी भावेश चा प्रामाणिक पणा, पाहता निवडुन दिलं.
सोबतच बहुजन/ जनसेवा परिवर्तन पॅनल मधून कुंदा कैलास जांभुळकर, वैभव बालगोविंद खोब्रागडे हे सुद्धा निवडून आले.
या करिता मनोज कोटांगले, सुखराम जांभूळकर,कार्तिक मेश्राम,राजकुमार मेश्राम, फिरोज कोटांगले, हुसेन मेश्राम, प्रशांत कोटांगले, राजकुमार भुरे,विलास गिर्हेपुंजे, योगेश्वर हुमे, देवा तरोने,योगराज भुरे,निरोज मेश्राम, मिथुन जांभुळकर,रमेश खेडीकर,एकनाथ कोटांगले,अतुल खोब्रागडे, भोजराम बडोले, नाशिक कोटांगले, हिरालाल कोटांगले, सुनील मेश्राम, रुपेश कोटांगले, ललित कोटांगले, अरविंद उके, पंकज सोनवाणे, साहिल उके,तेजस कोटांगले, तथा सर्व गावकरी बांधवांनी अभिनंदन केले.