नीरा नरसिंहपूर दिनांक :22
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,
नीरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथील लक्ष्मी नरसिंहाच्या पावन भूमी मधील माजी सरपंच आण्णासाहेब जगन्नाथ काळे यांची इंदापूर तालुका युवा सेना प्रमुख पदी निवड करण्यात आली. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी सरपंच आण्णासाहेब काळे यांची युवा सेना तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली. व निवडी नंतर निवडीचे पत्र देण्यात आले. आण्णासाहेब काळे बोलत आसताना म्हणाले की आपल्या पक्षाचे हात बळकट करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन सर्व सामान्य नागरिक आसो आथवा गोरगरीब कष्ट करू मजूर यांच्यासाठी सर्व प्रकारे सहकार्य करू व पक्ष बळकटीच्या कामासाठी इंदापूर तालुक्यात सातत्याने कार्यरत राहीन मला जी पक्षाने जबाबदारी दिली त्याचे मी पूर्णपणे पालन करीन निवडीनंतर आण्णासाहेब काळे यांचे उद्गार युवा सेना तालुका अध्यक्षपदी आण्णासाहेब काळे तर इंदापूर शहर प्रमुख पदी आशोक देवकर व कार्याध्यक्ष म्हणून जामदार यांची एक मताने निवड करण्यात आली. या निवडी प्रसंगी नरसिंहपुरचे माजी सरपंच संतोष मोरे, माजी सरपंच विलास ताटे, वस्ताद सचिन कदम, धनंजय पवार, रूपचंद जाधव, सहित बारामती दौंड इंदापूर या सर्व तालुक्यातील कार्यकर्ते बाळासाहेबाच्या शिवसेनेवर प्रेम करणारे सर्वच आजी-माजी सरपंच उपसरपंच व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
चौकट::-येणाऱ्या निवडणुकीमध्ये बावडा लाखेवाडी गटातून जिल्हा परिषदेसाठी शिंदे गटातर्फे उमेदवारीसाठी इच्छुक