युवराज डोंगरे/खल्लार
खल्लार नजिकच्या वडुरा-दिघी(जहानपूर)गट ग्राम पंचायतवर सगणे सिरस्कार यांच्या परिवर्तन पॅनलने आपले वर्चस्व स्थापित करीत सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.
18 डिसेंबर ला झालेल्या या निवडणुकीत रहाटे यांच्या ग्रामविकास पॅनल चा दारुण पराभव झाला तर सगणे व सिरस्कार यांच्या परिवर्तन पॅनल चे सर्व उमेदवार विजयी झाले . सरपंच पदाकरीता बाबुराव महादेवराव नितनवरे यांना 459 मते मिळाली तर प्रभाग क्रमांक 2 मधून जयश्री दिनेश बोबडे 143 व जयश्री प्रविण भोरखडे यांना 145 मते मिळाली. तसेच अविरोध झालेले उमेदवार प्रभाग क्रमांक 1 मधून प्रणिता गजानन नांदने, लता अनंत डाखोडे, संतोष काशिनाथ आठवले
प्रभाग क्रमांक 3 मधून आशिष भानुदास बुंधाडे ,सुधाकर बाबन सोळंके विजयी झाले.