युवराज डोंगरे/खल्लार
छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय, आसेगाव पूर्णा येथे मंगळवार दिनांक २० डिसेंबर २०२२रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संत गाडगेबाबा यांची ६६वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंम सेवकांनी स्वच्छता अभियान राबविले व महाविद्यालयातील परिसर स्वच्छ केला.तसेच संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रभारी प्राचार्य डॉ. भारत कल्याणकर या प्रसंगी म्हणाले की. संत गाडगेबाबानी आयुष्यभर खऱ्याटयाचा नवा धर्म जणमाणसात पोहचविला. त्यासोबतच माणुसकीचा संदेश दिला, माणसाला माणूस म्हणून जीवन जगता आले पाहिजे अशी शिकवण मानव जातीला दिला. आपले आयुष्य गरजवंत लोकांच्या सेवेत झिजविले, आणि हिच खरी ईश्वर सेवा आहे असे त्यानीं सांगितलं. खरा देव मूर्तित नाही तो तुमच्या समोर दरिद्री नारायणाच्या रूपाने प्रत्यक्ष उभा आहे. संत गाडगेबाबा यांची दशसूत्री सांगितली.
सेवा परमो धर्म हाच आमचा रोकडं धर्म आहे, बाबा म्हणायचे मला कोणी शिष्य नाही मी कुणाचा गुरु नाही. बाबांचा वैज्ञानिक दृष्टीकोण होता त्यानीं शिक्षणावर खूप भर दिला गोर गरिबांच्या मुलांनी शिक्षण शिकले पाहिजे असे बाबा म्हणत आहे असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रविण सदार यांनी संत गाडगेबाबा यांची दशसूत्री व बाबांच्या संपूर्ण जीवनावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकार डॉ. आशिष काळे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. रविंद्र इचे यांनी केले. आभार रोहित राऊत यांनी केले. या कार्यक्रमाला प्रा. अतुल चऱ्हाटे, प्रा. मनोज भुसारी, अविनाश कडू विध्यार्थी व रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते.