युवराज डोंगरे/खल्लार
नजिकच्या उपराई येथे बु रामरावजी खंडारे बहुउद्देशीय समाज विकास संस्थेच्या कार्यालयात संत गाडगेबाबा यांची 66 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
श्रीसंत वैराग्यमूर्ती, ग्रामस्वच्छता अभियानाचे पुरस्कर्ते, माणसात देव शोधणारे संत म्हणजे गाडगे बाबा होय. अंधश्रद्धा व बुवाबाजी यावर निर्मूलन करत बाबांनी प्रहार केला . बाबांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले व स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. असे मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष यांनी केले व आभार प्रदर्शन विशाल वंजारी यांनी केले.यावेळी संस्थेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.