युवराज डोंगरे/खल्लार
नुकतेच ऑल इंडिया प्रायमरी टीचर्स फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे नवी दिल्ली येथे शिक्षकांकरिता व्यावसायिक विकास कार्यक्रम अंतर्गत दोन दिवसीय राष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता.
यामधे महाराष्ट्र, केरळ, उत्तर प्रदेश आणि झारखंड यासह इतर राज्यातुन 20 शिक्षकांची निवड प्रशिक्षणकरिता करण्यात आली होती.
बदलत्या काळातील शिक्षकांपुढील शैक्षणीक आवाहने आणि शिक्षकांची व्यावसायिक भूमिका व विकास याकरिता हा प्रशिक्षण कार्यक्रम संघटनेतर्फे आयोजित करण्यात आला होता. शिक्षकांचा व्यावसायिक विकास व्हावा याकरिता राष्ट्रीय पातळीवर हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.यामध्ये प्रशिक्षित तज्ज्ञ राज्य स्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावतात.असे प्रशिक्षण आयोजित करणारी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ ही भारतातील एकमेव संघटना आहे. त्याचप्रमाणे जागतिक शिक्षक संघटनेची संलग्न असलेले अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ ही भारतातील एकमेव संघटना आहे. या प्रशिक्षणाकरिता महाराष्ट्र मधून राहुल चर्जन अमरावती, चंदन चंद्रकांत धकाते चंद्रपूर, विरेंद्र वाघमारे नागपूर, मंजुषा नंदेश्वर भंडारा, चौधरी चंद्रपूर ह्यांची प्रशिक्षणाकरता महाराष्ट्र राज्यामधून निवड करण्यात आली होती.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रामपाल सिंग यांचे हस्ते प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
अमरावती जिल्ह्यामध्ये आदरणीय किरण पाटील हे राष्ट्रीय आंदोलन त्रिसदस्यीय समिती मध्ये महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत त्याच प्रमाणे ते विदर्भ विभाग प्रमुख व राज्य उपाध्यक्ष म्हणून संघटनेचा कार्यभार सांभाळत आहेत. राहुल चर्जन यांची प्रशिक्षणाकरता अमरावती मधून निवड झाल्याबद्दल त्यांचे अमरावती जिल्ह्याच्या वतीने उत्कृष्टरित्या प्रशिक्षण घेतल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुढील प्रशिक्षण व संघटनात्मक कामकाजाकरिता त्यांना किरण पाटील ,पंडितराव देशमुख, निळकंठराव यावले, राजेंद्र होले, सुनिता पाटील, विजय उभाड, सुभाष सहारे, प्रविण खरबडे, सूरज मंडे, भूषण ठाकूर, संजय नागे, मनोज चौरपगार, सतीश गुजरकर, संतोष कोठाळे, मदन उमक, गजानन चौधरी, सतिश वानखडे, सुनिल बागडे, बबलू वानखेडे, प्रफुल्ल ढोरे, गजानन निर्मळ, पवण बोके, वृषाली देशमुख, जावेद शेख बिराम, सुनिल गोटे, प्रशांत ठाकरे, गणेश टिपरे, प्रमोद घाटोळ, प्रशांत भगेवार, उमेश शिंदे, गजानन घुरडे, यांनी अभिनंदन केले ही अमरावती जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. असे प्रासिद्धी प्रमुख सूरज मंडे यांनी कळविले आहे.