कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी:-
तुळशिराम शामराव कारेमोरे या आरोपीस पेस्को अंतर्गत सात वर्षांच्या शिक्षेची सजा काल न्यायमूर्ती द्वारा सुनावल्या गेली आहे.
तालुक्यातील पो.स्टे.कन्हान हदीत दिनांक १०/०५/२०२० चे रात्री ११.१३ वा.दरम्यान फिर्यादी यांचे रिपोर्ट वरुन पो.स्टे.कन्हान येथे अप . क्र . २२३/२०२० अन्वये कलम ३७६ ( २ ) ( जे ) ( एन ) , ३७६ ( अ ) ( ब ),५०६ भादवि . सह कलम ४ , ६ पोक्सो अन्वये गुन्हा नोंद झालेला होता.
दिनांक ० ९ / ०५ / २०२० चे दुपारी १२.०० वा . रोजी फिर्यादीची अल्पवयीन मुलगी ही आरोपी – तुळशीराम शामराव कारेमोरे , वय ५३ वर्ष , रा . सावला ( एंसंभा) गावात याच्या किराणा दुकानात सामान घेण्यास गेली असता नमुद आरोपीने पिडीतेला आत बोलावुन चॉकलेट देतो असे आमिष दाखवुन तिच्यावर जबरी संभोग केला होता.
सदर प्रकरणाचे तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती नंदा पाटील पोलीस स्टेशन केळवद यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठा करीता मा.कोर्टामध्ये सादर केले होते.
काल बुधवार दिनांक २१/१२/२०२२ रोजी मा.कोर्ट विद्यमान न्यायाधीश श्री.डी.जे. राठी यांनी वरील नमुद आरोपी तुळशीराम शामराव कारेमोरे,वय ५३ वर्ष,रा.सावला ( एंसंभा) ला कलम ९ , १० पोक्सो अक्ट मध्ये ०७ वर्ष सश्रम कारावास व ५००० / – रू . दंड दंड न भरल्यास ०५ महिने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.
सरकारचे वतीने एपीपी श्री. शाम खुळे यांनी काम पाहीले.कोर्ट कामात पैरवी अधिकारी म्हणुन पोलीस शिपाई ब . नं . १४६८ सैफल्लाह अहमद पोस्टे केळवद यांनी मदत केली आहे .