माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवड व्हावी यासाठी शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवा चरणी, उपाध्यक्ष महावीर जगताप यांचे साकडे… — इंदापूर तालुक्याचे लाडके दत्तामामा भरणे हे उद्या 23 तारखेला तिसऱ्यांदा आमदार होण्यासाठी शंभू महादेवानी संधी मिळउन द्यावी :- महादेवाला अभिषेक प्रसंगी तालुका उपाध्यक्ष महावीर जगताप यांचे उद्गार…

बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

            टणु तालुका इंदापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे तालुका उपाध्यक्ष तसेच टनु ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य महावीर जगताप यांच्या हस्ते शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव चरणी अभिषेक घालण्यात आला. 

           शिखर शिंगणापूर हे महाराष्ट्राचे कुलदैवत आसल्यामुळे या कुलदैवता चरणी महावीर जगताप हे नतमस्तक होऊन. माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे तिसऱ्यांदा आमदार होण्यासाठी शिखर शिंगणापूर येथील महादेवा चरणी नतमस्तक होऊन महावीर जगताप यांनी आशीर्वाद घेतला व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिखर शिंगणापूर येथे शंभु महादेवाला अभिषेक घालण्यात आला.

         यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट तालुका उपाध्यक्ष महावीर जगताप सह सर्व कार्यकर्त्यांनी महादेवाला महाअभिषेक घालण्यात आला.

          तालुका उपाध्यक्ष तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महावीर जगताप महा अभिषेक प्रसंगी पुढे बोलत असताना म्हणाले. की माजी राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी इंदापूर तालुक्यासाठी पाठीमागे दहा वर्षे सेवा केली. 

          तशीच इथून पुढेही तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याची संधी अशीच तिसऱ्यांदा मिळवी.

           विकास करण्यासाठी दत्तात्रय मामा भरणे यांचीच तालुक्याला गरज आहे. शिवशंभो महादेव दत्तात्रेय मामा भरणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. म्हणूनच अशीच सेवा त्यांच्या हातून घडावी व उद्याच्या 23 तारखेला इंदापूर तालुक्याचे आमदार म्हणून जास्तीत जास्त मताधिक्याने मतपेटीतून निवड व्हावी तालुका उपाध्यक्ष तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महावीर जगताप यांचे शिखर शिंगणापूर येथील महा अभिषेक प्रसंगी उदगार. 

          तालुका उपाध्यक्ष महावीर जगताप सह सर्व कार्यकर्ते यांनी शंभू महादेवा चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.

 चौकट

           इंदापूर तालुक्याचा चौफेर विकास करण्यासाठी आमदार म्हणून दत्तात्रय मामा भरणे हे निवडून आल्यानंतर अजित दादा पवार यांचे हात बळकट होतील. व पुन्हा अजितदादा पवार मुख्यमंत्री होतीलच.

तालुका उपाध्यक्ष महावीर जगताप यांचे उदगार..