प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
विधानसभा निवडणूक अंतर्गत उद्या मतमोजणी असल्याने महाराष्ट्र राज्यातील प्रशासन सज्ज झाले आहे व कुठल्याही बाबतीत अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासना द्वारे खबरदारी घेतली जात आहे.
याचबरोबर मतमोजणीच्या ठिकाणी शांतता राहावी यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूंनी एक्झिट पोल कल देत असल्यामुळे मतदारांत आनंदाचे वातावरण दिसून येत असल्याचे लक्षात आले आहे.
महाविकास आघाडी महाराष्ट्र राज्यात सत्तेवर आली तर पेशवाईला लगाम लागेल असे मतदारांचे मत आहे.तद्वतच महामुजोरीला,कायदेशीर मार्गाने झोडपून काढता येईल असे सुध्दा मतदारांचे म्हणणे आहे.
याचबरोबर विविध प्रकारच्या चोरीला व तस्करीला आळा घालता येईल आणि महाराष्ट्र राज्यात शांतता निर्माण करता येईल असेही मतदार बोलू लागले आहेत.
एक्झिट पोल नुसार अख्ख्या महाराष्ट्र राज्यातील मतदारांत जागोजागी चर्चेला उधाण आले असून उद्याच्या मतमोजणी कडे मतदारांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
मात्र,मतमोजणीची उत्कंठा शिगेला पोहोचली असतानाच उमेदवारांसह पक्ष पदाधिकाऱ्यांत आणि कार्यकर्त्यात धाकधूक आहे.
उमेदवार जिंकला तर रुपयांचा हिशोब नाही व हरला तर रुपयांचा हिशोब असेल.यामुळे पक्षांच्या पदाधिकाऱ्यांत हिशोबा बाबत कमालीची गुप्तता बाळगली जात आहे.