प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
बहुजन समाज पार्टी म्हणजे देशातील वंचित,शोषीत, अत्याचारग्रस्त व अन्यायग्रस्त बहुजन समाज घटकातील नागरिकांना सातत्याने जागरूक करणारी पार्टी.तद्वतच वैचारिकते अंतर्गत मानसिक गुलाम व पिडीत समाजातील सर्व नागरिकांना देशांतर्गत राजकीय व सामाजिक प्रवाहात आणूण त्यांना त्यांचे सर्व प्रकारचे हक्क सांगणारी चळवळ.
आणि देशातील सर्व नागरिकांच्या हक्कान्वये प्रत्येक क्षेत्रात समान भागीदारीसाठी झटणारी व संघर्ष करणारी एकमेव पार्टी.म्हणूनच बहुजन समाज पार्टीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व मनुवादी विचारसरणीचे राजकीय पक्ष,त्यांचे चमचे व दलाल, मनुवादी विचारसरणीच्या इलेक्ट्रॉनिक मिडिया व प्रिंट मीडिया सातत्याने विरोधात काम करतात हे लपून राहिलेले नाही.
याचबरोबर,”बहुजन समाज हा राजकीय,सामाजिक,व इतर क्षेत्रांच्या मुख्य प्रवाहात येता कामा नये यासाठी नेहमी विरोधात काम करतात आणि अपप्रचार करतांना कुठल्याही प्रकारची परिस्थिती त्यांच्यासाठी अवघड बनू नये याची खबरदारी ते सदैव घेतात.याला अनेक कार्यपध्दती जबाबदार असल्या तरी,”मुख्यत्वे जातियवादी मानसिकता आणि बहुजन समाज विरोधातील सांस्कृतिक कार्यपद्धत होय.
तेलंगणा विधानसभा निवडणुकी अंतर्गत,”बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांवर,होत असलेले जिवघेणे हमले अतिशय गंभीर असून,हमल्यातंर्गत असला प्रकार बहुजन समाजाला कमजोर समजण्याचा आहे.
मात्र,भारत देशातील बहुसंख्य समाज आता सतर्क होऊ लागला असल्याने बहुजन समाज पार्टीची अडवणूक करणे सोपे राहिलेले नाही.
तेलंगणा राज्यातील सुर्यापेट विधानसभा क्षेत्राचे बसपा उमेदवार श्री.वटू जनैया यादव यांच्यासह त्यांच्या गाडीचे चालक सतीश आणि सहकारी रमेश यांना गंभीर जखमी करण्यात आले आहे.
तेलंगणा राज्यात बहुजन समाज पार्टी,”सत्ताधाऱ्यांना सत्तेवर येण्यापासून रोखत आहे,”तर,काँग्रेस आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवत आहे.यामुळे तेथील राजकीय समीकरण बदलू लागले आहे.
एवढेच काय तर तेलंगणा राज्यात बहुजन समाज पार्टी सत्तेची चाबी आपल्या हातात घेण्यासाठी पुरी श्रम ताकद व वैचारिक अनुभव पणाला लावत आहे.
यामुळे तेलंगणा राज्यात भाजपा,कांग्रेस सुत्रधार आणि मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची राजकीय स्थिती डामडोल झाली आहे.
भांडवलदारांचे हैतेशी पक्ष सत्तेवर येण्यासाठी निती-कुटनीत अंतर्गत व्युव्हरचना आखताना,”बहुजन समाज स्वतःच्या बलावर सत्ताधारी बनू नये यासाठी किती वर्षे षडयंत्र करणार?आणि भांडवलदारी पक्षांचे,मिडियांचे षडयंत्र कुठपर्यंत चालणार?