डॉ.जगदीश वेन्नम

संपादक

गडचिरोली, दि.22 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय गडचिरोली अंतर्गत कर्ज योजने अंतर्गत अनुसूचित जातीतील मांग/मातंग/मादगी/मादीगा व या समाजातील बारा पोट जातीतील लाभार्थीं करिता उद्दीष्ट प्राप्त झालेले असून इच्छूक लाभार्थ्यांनी 02 डिसेंबर 2022 पर्यंत जिल्हा कार्यालय गडचिरोली येथे प्रत्यक्ष येऊन रीतसर अर्ज सादर करावे. लाभार्थ्याशिवाय इतर व्यक्ती कडून अर्ज स्विकारण्यात येणार नाही. महामंडळास प्राप्त उद्दीष्टाच्या अधीन राहून थेट कर्ज योजने अंतर्गत कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात येईल याची लाभार्थीनी नोंद घ्यावी. कर्ज प्रकरण 1.00 लक्ष च्या मर्यादित मंजूर करण्यात येईल. योजनेतील अटी व शर्तीचे परिपत्रक या समाज कल्याण कार्यालयातील नोटीस बोर्डावर लावण्यात आले आहे. कार्यालयाचा पत्ता साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,आय.टी.आय.चौक,एल.आय.सी. रोड,गडचिरोली,येथे संपर्क साधावा असे साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ गडचिरोली, जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com