युवराज डोंगरे/खल्लार

 नुकत्याच घडलेल्या श्रद्धा वालकर या युवतीची हत्या करून ३५ तुकडे करण्यात आले. यातील आरोपी आफताब पुनावाला याला तात्काळ फाशी देण्यात यावी. तसेच नुकतीच दर्यापूर येथे एका अल्पवयीन युवतीवर गांधीनगर येथील दोन धर्मांधांनी बलात्कार केला आणि ती गर्भवती राहीली तसेच तीला जीवे मारण्याची धमकी दिली. यापूर्वीही काही महिन्यांपासून दर्यापूर येथे हिंदु युवतींना त्रास देणे, धक्का देणे, धमकी देणे, चाकुचा धाक दाखवणे, रस्ता अडवणे इत्यादी प्रकारे त्रास देण्याच्या घटना घडल्या आहेत आणि दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे हिंदु युवती आणि पालक वर्गामध्ये चिड निर्माण झाली आहे. 

अशा घटनांमधून धर्मांध युवकांकडून दर्यापूर येथील कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला जातो आहे.लव्ह जिहादच्या वाढत्या घटना पाहता तात्काळ लव्ह जिहाद विरोध कायदा लागू करण्यात यावा अशी एकमुखाने समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या आंदोलनात मागणी केली.

 आंदोलनाच्या आधी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या घटनांचा निषेध म्हणून दर्यापूर बंदची घोषणा करत गोरक्षण चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर मोर्चा काढला. याला प्रतिसाद देत दर्यापूर करांनी आंदोलनाच्या वेळीपर्यंत आपली प्रतीष्ठाने बंद ठेवत या घटनांबद्दल आपला निषेध नोंदवला.

 यावेळी विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी या विषयी आपले मत व्यक्त केले.

                                      आंदोलन करते.श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू जनजागृती समिती,धर्म रक्षक ग्रुप, आणि समस्त हिंदूत्ववादी संघटना दर्यापूर हे हजर होते.

 

दर्यापूरात कडकडीत बंद

 

धर्माध आफताब पुनावाला याने हिंदू तरुणीच्या निर्गम हत्येचा विरोध, दर्यापूरात झालेल्या लव जिहाद घटनेचा निषेध करण्यासाठी तथा लव जिहाद विरोधी कायदा लागू करण्यासाठी विविध हिंदू संघटनाच्या वतीने करण्यात आलेल्या दर्यापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. बंदमध्ये दर्यापूर शहरातील कापड बाजार, गोरक्षण चौक, शिवाजी चौक, बस स्टँड चौक, या महत्वाच्या बाजार पेठेत व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवत प्रतिसाद दिला. यावेळी दर्यापूर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com