महाकृषि ऊर्जा अभियान कुसुम – ब योजना लाभार्थी शेतकऱ्यांनी अर्जातील त्रुटी पुर्तता करावी – महाऊर्जाचे आवाहन

 

ऋषी सहारे 

संपादक

 

गडचिरोली : महाकृषी ऊर्जा अभियान पी.एम. कुसुम घटक -ब योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात अद्याप पर्यंत एकूण १५९६ अर्ज महाऊर्जाच्या ऑनलाईन कुसुम-ब पोर्टलवर प्राप्त झाले आहे. या अर्जांपैकी ४११ लाभार्थ शेतकऱ्यांनी सौर पंप योजनेचा लाभ घेतलेला आहे. एकूण नव्याने प्राप्त ११८५ अर्जांपैकी २७३ लाभार्थी शेतक-यांच्य अर्जांमध्ये कागदपत्रांची त्रुटी आढळली असल्यामूळे त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. यासर्व लाभार्थीना कुसुम पोर्टलवरुन एसएमएस त्यांच्या भ्रमणध्वनीवर पाठविण्यात आले आहे. चंद्रपूर येथील महाऊर्जा जिल्हा कार्यालयामार्फत लाभार्थीच्य कागदपत्रांची त्रुटी पुर्तता करण्याकरीता भ्रमणध्वनीद्वारे संबंधितांना कळविण्यात आले आहे तरी अद्यापही बऱ्याच लाभार्थ मार्फत त्रुटींची पुर्तता करण्यात आलेली नाही.

              त्रुटी अर्ज असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांना मिळालेल्या युजरनेम व पासवर्डचा उपयोग करुन ऑनलाईन पोर्टलवर आवश्यक त्रुटी असलेले कागदपत्रे अपलोड करुन त्रुटी पुर्तता करावी याकरीता महाऊर्जाच्य https://kusum.mahaurja.com/benefshome या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच कागदपत्रे अपलोड होत नसल्यास किंवा कुठलिही अडचण संभावतास महाऊर्जा जिल्हा कार्यालय, चंद्रपूर येथे भेट द्यावी. जिल्हा मुख्यालय, चंद्रपूर पत्ता गाळा क्र. ४ आणि कार्यालय क्र. १ गझ टॉवर वडगाव फाटा, एनफिल्ड शोरूम सामोर नागपुर रोड, चंद्रपूर ४४२४०: दूरध्वनी : ०७१७२-२५६००८ E-mail: domedachandrapur@mahaurja.com जे लाभार्थी येत्या ०७ दिवसांत त्रुटींच पुर्तता करणार नाही त्यांचे अर्ज निकाली काढण्यात येतील व मान्यता मिळाल्यास भविष्यात त्यांच्या अर्जाचा क्रम हा प्रथम त्रुटी पुर्तता करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या अनुषंगाने गणला जाईल. असे जिल्हा व्यवस्थापक, महाऊर्जा जिल्हा कार्यालय चंद्रपूर यांनी कळविले आहे.