डॉ. जगदिश वेन्नम

संपादक

सिरोंचा, दि. २१ नोव्हेंबर : तेलंगणा राज्यातील वन कर्मचारी महादेवपुर वनपरिक्षेत्रा अंतर्गत असलेल्या पंकेलापलमेला परिसरात दि. १७ नोव्हेंबर रोजी गस्तीवर असताना मिनी मेटॅडोरवर मागे तांदळाचे पोते आणि त्या आत मौल्यवान सागवानाची तस्करी करताना रंगेहात पकडून अंदाजीत आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

 

त्यांनतर तेलंगणा वनाधिकाऱ्यांनी आरोपींना ताब्यात घेऊन सदर प्रकरणाची सखोल चौकशी केली असता तेलंगणा च्या सिमेलगत असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या सिरोंचा वनातील मौल्यवान सागवान लठ्ठे असल्याचे तपासात आरोपीकडून निष्पन्न झाल्याने सदर माहिती उपवनसंरक्षक सिरोंचा यांना कळविले असता सदर सागवान सिरोंचा वन विभागातील नसल्याचे उपवनसंरक्षक यांनी म्हटले असून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात तर नाही ना ? म्हणूनच अत्यंत गोपनीय रित्या सदर प्रकरणाची सखोल चौकशी न करता उपवनसंरक्ष यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिले. यामुळे  संशय व्यक्त करीत जनकल्याण भ्रष्टाचार समाज उन्नती समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी आरोप केला आहे.

 

सिरोंचा वन विभागात या आधीही तेलंगणाच्या सीमावर्ती भागातील तस्करांनी कधी प्राणहिता नदीचा आधार घेऊन तर कधी कल्व्हर्टमधून तस्करी केलेली आहे. सिरोंचा तालुक्यातील जंगलातून गेल्या सहा दशकांपासून कोट्यवधी रुपयांचे मौल्यवान सागवानाची तस्करी केली जात आहे. तसेच सिरोंचां वनविभागात वन्यप्राण्याची तस्करी सुुध्दा होत असल्याचे समोर आलेले आहे.

 

तेलंगणा राज्यातील वन कर्मचाऱ्यांनी धाडसी कारवाई करीत महाराष्ट्र राज्यातून आलेले सागवानाचे लठ्ठे पकडले असता चौकशीअंती सदर सागवान लठ्ठे हे सिरोंचा तालुक्यातील जंगलातीलच आहे असं म्हटल्यानंतर देखील सिरोंचा वन विभागाचे  उप वनसंरक्षक हे सदर प्रकरणाला कुठेही वाच्यता न करण्याचा आदेश वन कर्मचाऱ्यांना दिला आहे. त्यामुळेच उपवनसंरक्षकांना अशी का गरज पडली की, कुठलीही गोपनीय माहिती बाहेर पडू नये यासाठी सर्वांना तंबी देण्यात आली एवढेच नव्हे तर सिरोंच्या वनविभागातील माहिती फोटोसह गुगल मॅप जातेच कशी असाही प्रश्न समस्त वन कर्मचाऱ्यांना बोलवून केला आहे .त्यामुळे उपवनसंरक्षक या प्रकरणाला का बगल देत आहेत ! यामुळे शंका व्यक्त होत असल्याचा आरोपही संतोष ताटीकोंडावार यांनी केला आहे.

 

सदर सागवान लठ्ठेची तस्करी महाराष्ट्र राज्यातून तेलंगणा राज्यात होईपर्यंत महाराष्ट्र राज्यातील वन विभागाला माहिती का मिळत नाही? गेल्या दीड वर्षापासून सिरोंचा वन विभागाचे अनेक प्रकरणे निदर्शनास आणुन देऊन सुध्धा याकडे सिरोंचा वन विभाग दुर्लक्ष का करीत आहे? हा प्रश्न निर्माण होतोय. यावरून सिरोंचा वन विभागाची गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे अयशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. 

 

जनकल्याण भ्रष्टाचार समाज उन्नती समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोडावार यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सिरोंचा वन विभागात आलेला निधी, खर्च झालेला निधी, शिल्लक निधी  व जंगलातील बीट चौकशीची तपासणी करण्यात यावी असे निवेदन दिलेले आहे. जर निवेदन देऊनही वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी यावर लक्ष देत नसतील तर न्यायालय शिवाय पर्याय नाही? असे संतोष ताटीकोडावार यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.

 

तेलंगणातील वन कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी उकल करून देत सागवान तस्करी होत असल्याचे स्पष्ट करुनही सदर प्रकरणाकडे सिरोंचा वन विभागाचे उपवनसंरक्षक, वनाधिकारी व वन कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप जनकल्याण भ्रष्टाचार समाज उन्नती समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोडावार यांनी केले आहे..

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com