प्रिय बेटा..

    मनस्वी शुभाशीर्वाद!

          “दबलेल्या आयुष्यात आणि अस्वस्थ जिवनात,,,”तुझ्या वाढदिवसानिमित्त,,,”मला मंगलमय कामना किंवा शुभेच्छा प्रदान करता आल्या नाहीत..

         तसाही ४ महिन्यांपासून तुझ्या सोबत अजिबात संपर्क नाही किंवा तुझ्यासोबत भेट सुद्धा झालेली नाही..

        याचबरोबर माझ्या खडतर जीवन प्रवासाला अनुसरून माझे इतर घरच्या व्यक्तींसोबत सुध्दा संबंध नाहीत…

        मात्र,तुला वाढदिवसावर शुभेच्छा देण्यासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था काल माझ्याकडे नव्हती आणि तुझा संपर्क क्रमांक सुध्दा मला माहिती नाही.

***

          प्रिय बेटा,घडामोडी अंतर्गत आयुष्यात काय घटना घडतील व कसे प्रसंग उदभवतील हे सांगणे कठीण असते.

        मात्र,बऱ्याच मनुष्य मात्रांच्या आयुष्यात काटेरी वाटा व अस्पष्ट मार्ग असतात.तद्वतच “दिशा,एकप्रकारे अदृश्य कार्यपद्धत असल्यामुळे,या कार्यपद्धती अंतर्गत कधी यश येतय तर कधी अपयश येतय..

        यश आले तर चारित्र्य उजाळतय व अपयश आले तर चारित्र्य दबतय!..हा फरक भल्याभल्यांना समजत नाही किंवा भले मानसं समजून घेत नाही…

***

       प्रिय बेटा,दबलेल्या चारित्र्यातंर्गत एखाद्या व्यक्तीला जवळ ठेवणारे व त्याला साथ देणारे आत्मविश्वासी,समजदार आणि कर्मशिध्दांतान्वये मैत्रिभावी असतात,याबाबत प्रसंग बोधच यथार्थ करतोय…

          भितीच्या ओझ्याने आपण दबल्यात याची जाणीव मला झाली आहे आणि याच दबावात आपण मला वैचारिक द्वंदाने बाजूला सारले असावेत हे नाकारता येत नाही.

***

        प्रिय बेटा,तुलाही माहिती आहे,तुझा बाप चोर व दरोडेखोर लुटारू नाही,व्यसनाधीन नाही,हत्यारा नाही,बिळ्याब्रिस्टाल व गांजा ओढणारा नाही,दारु पिणारा नाही,,

      तुला याची कल्पना कदाचित असेल की,”तुझा बापाने,”स्वाभिमान व अस्मिता गहाण ठेवून पत्रकारिता अजिबात केली नाही किंवा पत्रकारिता करताना तुझा बाप रुपयापुढे कधीच झुकला नाही…केवळ आणि केवळ जनतेचे हित लक्षात घेऊन पत्रकारितेला वेगवेगळ्या प्रकारे वळण दिले आणि एक वेगळा आयाम दिला.

***

           तथागत भगवान गौतम बुद्ध एक उत्तम वैचारिक शिंध्दांत सांगून गेलेत..‌”तो असा,…”जेव्हा तुमचे विरोधक किंवा कुणीही शतप्रतिशत विरोध करतात तेव्हा तुमची योग्य दिशा वारंवार तपासण्यासाठी व उजाळण्यासाठी सुयोग्य संधी त्यांनी तुम्हाला दिलेली असते.सदर संधीचा उज्वल भविष्यासाठी व मजबूत कर्मासाठी मनस्वी स्विकार करायचा असतो.

***

        प्रिय बेटा,एखाद्या प्रसंगानुरूप कुणी चारित्र्याचे वारंवार हनन केले म्हणून चारित्र्य कलंकित होत नाही तर चारित्र्याची संपन्न प्रक्रिया मंदावते.मात्र,ज्याचे चारित्र्य – ज्याचे चित्त त्यांनाच माहीती असते.

      माझ्या अयोग्य संकट काळात माझ्याही बाबतीत कळत नकळत हेच घडत आहे.पण,कायदेशिर भुमिका किंवा कायदेशीर कार्यपद्धत चारित्र्याचा संपन्न भाग असतोच असे मुळीच नाही.यामुळेच माझ्या चारित्र्याच्या हनना अंतर्गत मी अनुसूचित जाती जमाती प्रबंधक कायद्यांतर्गत किंवा बदनामी अंतर्गत कुठल्याही प्रकारची कायदेशीर कार्यपद्धत अवलंबली नाही.याला कारण एकच आहे,मला विचार संघर्षातंर्गत किंवा घटनाक्रम घडामोडी अंतर्गत पराभूत व्हायचे नाही… 

     तद्वतच मरणे सोपे आहे..मात्र निरोप घेणे कठीण आहे.निरोपामध्ये अनेक विचार,अनेक घटना,अनेक कार्य,अनेक कर्तव्य,अनेक प्रकारची समझदारी व अनेक प्रकारचे जिवन एकवटले असते..

     तत्वतः “विजय हा पराभवात दडलेला असतो,हा प्रगल्भ विचार अतिशय जाटील व जोखमीचा असतो हे मला मान्य आहे..

***

         प्रिय बेटा,

            माझ्या भावना सार्वजनिक करतो आहे.मात्र,तु नाराज होवू नकोस.तद्वतच तुला देत असलेल्या मंगल कामना तु स्विकारतोस की नाही हे तुझ्या विचारावर व तुझ्या विचारातंर्गत भुमिकावर अवलंबून आहे..

  मात्र,

    तु सदैव सुखी,समाधानी,निरोगी,रहावे….तुझी सर्व प्रकारची सुयोग्य भरभराटी व्हावी…तुझे उज्वल भविष्य प्रकाशमय बनावे…तु अनेकांची प्रेरणा बनावा आणि आधारस्तंभ व्हावा… तुझ्या ओजस्वी वाणीतून सर्वांचे हित प्रकट व्हावे… तुझ्या कर्तृत्वाने अनेकांचे कल्याण व्हावे… तुझ्या उज्वल भविष्यात केवळ आणि केवळ यशाचे स्पंदन झळकावे…या मंगलमय कामनांसह तुला अनंत पराकोटीच्या हृदयस्पर्शी हार्दिक शुभेच्छा!…

****

                     तुझा बाप

                  मुख्य संपादक

                  दखल न्यूज भारत..

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com