मैदानी खेळात विभागीय स्तरावर यश भांडेकर याचा क्रॉस कंट्री स्पर्धेत प्रथम क्रमांक…

भाविकदास करमनकर 

 धानोरा तालुका प्रतिनिधी 

          दरवर्षीप्रमाणे यंदाही विभागीय स्तरावरचे तालुका जिल्हा व विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा 2024 25 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा तालुकास्तरावर 18 सप्टेंबर 2024 चातगाव येथे आयोजित करण्यात आली होती.

           यात यश भांडेकर यांनी 19 वर्षाखाली क्रॉस कंट्री या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता. जिल्हास्तरावर ही स्पर्धा आठ नऊ दहा ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हा स्टेडियम गडचिरोली येथे पार पडली होती. यश भांडेकर यांनी एकोणवीस वर्षाखाली क्रॉस कंट्री या खेळामध्ये द्वितीय क्रमांक मिळविला होता. त्यांनी आपले विजयाचे घोडदोड कायम ठेवत नागपूर विभागीय 19 वर्षे वर्षाखालील वयोगटात त्याला नागपूर विभागातर्फे क्रॉस कंट्री या खेळासाठी निवड झाली.

           विभागीय स्पर्धा ही चंद्रपूर जिल्हा संकुल चंद्रपूर येथे 19 ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता पार पडली. त्यात त्यांनी ॲथलेटिक्स या स्पर्धेतील क्रॉस कंट्री या खेळामध्ये आपल्या विजयाचे घोडदौड कायम ठेवत प्रथम क्रमांक पटकाविला.

         या त्याच्या यशाबद्दल श्री साईबाबा ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष श्रीमती शालिनीताई रमेशचंद्र मुनघाटे, कार्याध्यक्ष अशी आशिष रोहनकर संस्थेचे सचिव सौरभ रमेशचंद्र मुनघाटे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पंकज चव्हाण शारीरिक शिक्षण विभाग ज्युनिअर चे प्राध्यापक विराग रणदिवे यांच्या मार्गदर्शनात यश भांडेकर यांनी सुयश मिळविले प्रा टी बी धाकडे प्रा बी पी करमणकर प्रा के आर खोब्रागडे प्रा आवारी प्रा निवेदिता वटक व महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच प्रशासकीय कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले.