निखळलेली दारं…

मिलिंद वानखेडे 

         मुंबई 

     आपल्या घराची शोभा नेहमी कवाड वाढवत असते.पूर्वीच्या राजेशाह्या पाहिल्या की, राजवाड्यांचे व किल्यांचे दरवाजे मजबूत असतील तर,”तीच शाही,मजबूत समजली जायची…

         आज घडीला कोणत्याच राजकीय घराला ना कवाड,ना खिडकी,ना तटबंदी राहिली…..

       त्यांचे कारण तरी काय असावे? “तर,ना कोणाला चोरीची भिती,ना कुणाला कशाची भिती..? 

   कारण सर्व सारखेच? सर्व सारखेच असतील तर… 

    त्यांना कशाचीही गरज नसते? 

         त्यांचे दरवाजे… त्यांनी स्वतःहून खिळखिळे करून घेतले आहेत.ना कडी,ना कोयंडा……

     आओ,जाओ,घर तुम्हारा…. उंदीर नाचो,या घुशीनी भिंती पोखरून भिंतीला भगदाड पाडो,किंड्या मुंग्यांची राहुट्या होओ,”की,विषारी प्राण्याचा वावर वाढो?कोणाला कशाचेच देणे घेणे नाही.ही सध्या महाराष्ट्राची,”ना आतला ,ना बाहेरचा,ही परिस्थिती आहे.

        वेताळाच्या घरात एक मोडकळीस आलेली खुर्ची!…जिच्यात स्वाभिमान जिवंत राहिलेला नाही…

    अशी एक खुर्ची आहे.त्या खुर्चीवर बसण्याची स्पर्धा लागलेली आहे.त्या खुर्चीच्या खाली बाॅंब्म आहे,बाजूंनी विषारी श्वापदे,भटके,पिसाळलेले प्राणी,किडे,मुंग्या,कोल्हे,लांडगे, यांचा वावर वाढला आहे. 

      तरीही चारी पाय खिळखिळे झालेल्या खुर्चीवर बसण्याची स्पर्धा लागलेली आहे.

       पण…

या खुर्चीवर बसणे किती धोकादायक आहे.माहीत असूनही बिनकवाडाच्या घराकडे रेलचेल वाढली आहे.

         म्हणून माझा महाराष्ट्र सुरक्षित ठेवायचा असेल आणि सुरक्षित तटबंदी असलेला महाराष्ट्र,पुरोगामी व सुसंस्कृत महाराष्ट्र पहायचा असेल,शिवाय खुर्ची मजबूत करायची असेल, चांगले दारे,खिडक्या करून बलशाली महाराष्ट्र करायचा असेल….

तर… 

जास्तीत जास्त लोकांनी घराबाहेर पडून…. 

    शाश्वत व सुरक्षित घर निर्माण करण्याची गरज आहे.या घरातील सदस्यांमध्ये एकोपा असणे हीच खरी खुरी सुरक्षित,बलशाली व कणखर महाराष्ट्राला गरज आहे.

       महाराष्ट्र मजबूत करायचा असेल तर वाळवी लागलेला दरवाजा काढून मजबूत दरवाजा बसवणे गरजेचे आहे.पण सर्वत्रच वाळवी लागलेले दरवाजे असतील..तर महाराष्ट्राचे भवितव्य धोक्यात आहे.