
“आज आमचा महाराष्ट्र आणि संपूर्ण देश प्रतीक्रांतीच्या लाटेतून जात आहे.
नैसर्गिक क्रांती नंतर म्हणजे पृथ्वीच्या उत्क्रांतीनंतर कोट्यावधी वर्षांनी प्रथमच जेंव्हा मानवाने अमानवीय “कुटनीतीने “प्रतीक्रांती केली,आणि निसर्गनियमांविरुद्ध मानवताविरोधी तत्वाना जन्माला घातले. जीला आपण ‘ सोफेस्टिकेटेड कल्चर ‘ म्हणू शकतो.हा निसर्ग नियमांवरचा मानवाकडून झालेला पहिला हल्ला होता.
या प्रतीक्रांती विरुद्ध पहिली क्रांती तथागत भगवान बुद्धानी या पृथ्वीतलावर करुन प्रथमच त्या “कुटनीती / सोफेस्टिकेटेड ” कुसंस्कृतीवर ” निसर्ग नियमांवर आधारलेल्या धम्माच्या संशोधनातून ” हल्ला चढवला…….
आणि विश्वाला पुन्हा एकदा सुमारे 5000 वर्षांपूर्वीच्या सिंधू आणि ग्रीक संस्कृतीमध्ये प्रयोगातून अस्तित्वात असलेल्या लोकशाही मूल्यांना म्हणजेच स्वातंत्र्य,समानता,न्याय आणि बंधुता या तत्वाची पुन्हा एकदा जगाला ओळख करुन दिली!
त्यांच्या महापरीनिर्वाणानंतर अवघ्या 100 वर्षांच्या आत याच “धम्मक्रांती ” विरुद्ध पुन्हा एकदा महायान आणि हीनयानाच्या भेदाच्या रूपाने प्रतीउत्क्रांतीला सुरुवात झाली.
या प्रतीउत्क्रांतीला थोपवण्याचे प्रयत्न सम्राट अशोक,सम्राट कनिष्क आणि सम्राट हर्षवर्धन यांनी केले. त्यांच्या काळात त्यांनी धम्माला राजाश्रय दिल्यामुळे देश पुन्हा एकदा निसर्गाच्या जवळ जातांना दिसला.
या सम्राटांच्या कार्यकाळानंतर पुन्हा एकदा अवघ्या 100 वर्षांच्या आत पुष्यमित्र शून्गाच्या रूपाने धोक्याने या देशात प्रतीक्रांतीची लाट आणली,जी सुमारे साढेतेराशे वर्षे कायम टिकली. या काळात देशात अनेक परकी्यांनी आक्रमणे करुन राजकीय उलथापालथी या देशात केल्या. परंतू , या “कुटनीतीने म्हणजेच सोफेस्टिकेट ” शक्तीने आपले अस्तित्व कायम टिकवून ठेवले…!
या कुटनीती आणि कुसंस्कृतीच्या जोखडातून देशाला बाहेर काढण्याचा प्रयत्न अनेक संत आणि क्रांतिकारकांनी केला.
संत कबीर,छत्रपती शिवाजी महाराज,संत तुकाराम महाराज,म.फुले दाम्पत्य,छत्रपती शाहू महाराज यांसारख्या विविध महापुरुषांनी या अनितीला अनेक रिष्टेलस्केलचे धक्के देऊन वंचित बहुजन समाजाला जागृत केले.याच या महापुरुषांनी केलेल्या उत्क्रांतीच्या आधारावर…….
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशात सुमारे साढे तेराशे वर्षानंतर प्रथम …..
संविधानक्रांती…
त्यानंतर धम्मक्रांती घडवून आणली…
याच संविधानक्रांतीनंतर अवघ्या 100 वर्षांच्या आतच पुन्हा एकदा हीच “कुटनीती म्हणजेच सोफेस्टिकेटेड “कुसंस्कृती 2014 पासून ते आज 2024 पर्यंत कोरोनाच्या गतीने डोके वर काढतांना दिसत आहे!
हे असे का झाले….?
साढेतेराशे वर्षाचा काळा इतिहास आमच्या जनतेने म्हणजे विशेषकरुन अन्यायग्रस्त वंचित,उपेक्षित,बहुजन ओबीसी बुद्धीजीवी वर्ग का विसरले….?
त्याचे कारण एकच ते म्हणजे आम्हाला सर्वकाही लाभ फुकट मिळाल्याने त्याचे महत्व आम्हाला नाही,हेच वास्तव आहे.!
उलट महापुरुष,तत्ववेत्ते यांचा जन्मच त्या क्रांती करण्यासाठी झालेला असतो. असा नाकर्तेपणाचा आव आणून आम्ही त्यांना घरातील प्रतिमेत,सार्वजनिक स्मारकात बंदिस्त करुन आम्हीच त्यांच्यावर उपकार केल्याचा आव आणतो…..
अशा मानसिकतेत आमची जडणघडण करण्यात गेल्या 75 वर्षात RSS यशस्वी झाल्यामुळेच, तीने आता कोरोनाची गती घेतलेली आहे…
टीप :- या लेखाचा उत्तरार्ध उद्याच्या भागात……
प्रत्येकाने आपल्या मोबाईल मधील जेवढे व्हाट्सअप गृप आणि वयक्तिक मो. नं. असतील त्या सर्वांवर या पोस्ट फॉरवर्ड कराव्यात.हीच जागृती देशाची क्रांती होऊ शकते……