वाशिम प्रतिनिधी /आशिष धोंगडे

 

 

वाशिम:- तालुक्यातील ग्राम लाडेगाव येथील ग्रामपंचायत येथील अंदाधुंद कारभार व विविध कामातील झालेल्या भ्रष्टाचाराची योग्य चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या १४ फेब्रुवारी पासून स्थानीय पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू असलेले ठिय्या आंदोलन अखेर प्रशासनाच्या पुढाकाराने विनंती वरुण व ठोस आश्वासन दिल्यामुळे २१ऑक्टोबर रोजी स्थगित करण्यात आले.

१४ फेब्रुवारी ते २१ ऑक्टोबर असे २५० दिवस सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाची आंदोलन कर्ते परशुराम अण्णा सुरजूसे यांना कारंजा तहसील नायब तहसिलदार हरणे यांचे हस्ते आश्वासन देऊन तथा लिंबू पाणी पाजून आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी आंदोलन करत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व आंदोलन मागे घेत असताना आदोलन क्रत्याची जी मागण्या आहेत त्या दुर्लक्ष होऊ नये एवढीच विनंती त्यांनी केली आहे या वेळी शेतकरी नेते गजानन अमदाबादकर व ठिय्या आंदोलन समिती सदस्यांसह गटविकास अधिकारी राठोड, हंसराज शेंडे,बंडू इंगोले,ग्राम गायवळ सरपंच,ग्राम जयपूर सरपंच विजय काळे सरपंच कृषी अधिकारी आदी उपस्थित होते. ठिय्या आंदोलन समितीचे सदस्य व आंदोलन कर्ते परशुराम अण्णा सुरजूसे यांनी यावेळी आपण प्रशासनाच्या ठोस आश्वासनामुळे आंदोलन स्थगिती देण्यात आली असल्याचे सांगितले.

 

आशिष धोंगडे

वाशिम प्रतिनिधी

दखल न्युज भारत

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News