पारशिवनी :- पारशिवनी तालुका ग्रामसेवक संघटना. व तहसिल कार्यालय महसुल विभाग. पोलीस विभाग. आरोग्य विभाग व पत्रकार संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमानाने सहावे वर्षी दिवाळी निमित्त आदिवासी क्षेत्रातील किंरगी छर्रा या गावांमध्ये साडी चोळी व भेटवस्तू. धोतर. पातळ. पॅटपिस. मिठाई वितरण सोहळा घेऊन किंरगी छर्रा वासीयांची दिवाळी गोड करण्यात आली.
पारशिवनी पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी प्रदीप बमनोटे यांनी २०१६ ला या प्रेरणादायी उपक्रंमाचा शुभारंभ केला. त्यानुसार प्रति वर्षी दिवाळी निमित्त आदिवासी क्षेत्रातील एका गावाची निवड करूण त्या गावातील प्रत्येक कुटुंबाला साडी चोळी व भेटवस्तू देऊन एक त्यांच्या सोबत घालवून त्यांच्या समस्या व गावातील समस्या जाणून घेण्यासाठी व ग्रामस्ताशी मोकळ्या मनाने चर्चा करून शोबत स्नेह भोजनाचा आस्वाद हा या उपक्रंमाचा उद्देश. यावेळी या प्रेरणादायी उपक्रंमात सौ. वंदना सवरंगपते उपविभागीय अधिकारी हस्ते प्रेरणादायी उपक्रंमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. मंगलाताई उमराव निंबोने सभापती तर विशेष अतिथी प्रशांत सांगडे तहसिलदार पारशिवनी. सुभाष जाधव गटविकास अधिकारी पारशिवनी. सौ. अर्चनाताई वंजारी मुख्याधिकारी नगरपंचायत पारशिवनी. पारशिवनी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भुजंगराव ढोरे. ईस्वर खंगार. गोपाल कडू. विनायक गहाणे अध्यक्ष ग्रामसेवक संघटना. देशमुख उपगटविकास अधिकारी. अंगद जाधव अभियंता. शांताताई कुंभरे जिल्हा परिषद सदस्य. राजूभाऊ कुसुंबे सदस्य जिल्हा परिषद. नाईक विस्तार अधिकारी. सुधाकर मेंघर. डॉ. इरफान अहमद शेख. धनराज मडावी जिल्हाध्यक्ष नागपुर गोंगपा. दिवाकर भोयर. प्रकाश कामडे सरपंच. गौरव पनवेलकर. प्रेम भोंडकर. उपसभापती करूणाताई भोवते. सौ.तुलशी दियेवार यांचा प्रमुख उपस्थितीत आदिवासी भागातील किरंगी छर्रा या गावातील ६० कुंटूबियाना साडी चोळी व भेटवस्तू. धोतर. पातळ. पॅटपिस. मिठाई. ताट. व ईतर साहित्य दिवाळी निमित्त वितरण करण्यात आले. यावेळी ग्रामस्ताना तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी शासनाच्या योजनाची माहिती दिली व लाभ घेण्याचे आवाहन केले. गटविकास अधिकारी सुभाष जाधव यांनी पंचायत समिती अंतर्गत योजनाची माहिती दिली. सौ. वंदना सवरंगपते उपविभागीय अधिकारी यांनी ग्रामस्थांशी भावनिक नाते निर्माण करून शासनाच्या कल्याणकारी योजना व लाभाच्या योजना. या विषयी माहिती दिली व समाधान शिबीर गावात घेऊन समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुनेश दुपारे यांनी केले. कार्यक्रमा चे प्रास्ताविक पत्रकार गोपाल कडू यांनी करून कार्यक्रमा ची रूपरेशा ठेवली तर आभार प्रदर्शन अरूण बांबल ग्रामविकास अधिकारी यांनी केले. या प्रेरणादायी उपक्रंमात प्रत्येकक्ष. अप्रत्यक्षपणे आथीँक व भेटवस्तू स्वरूपात मदत करणाऱ्या दान दात्यांचे आभार मानले. तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रामसेवक रमेश ठवरे. धर्मदास घारड. डॉ. शांतिभुषन तायवाडे धर्मदास गांवडे. सौ. वर्षाताई कोकोडे. अर्चनाताई साखरे. मिनाताई भिवगडे. प्रियांका बोरकर. शुषमाताई मोरे. देशमुख. दिनकरराव ईगळे. सह सर्व ग्राम सेवकानी आदिनी अथक परिश्रम घेतले.