निरा नरसिंहपुर दिनांक:21

प्रतिनिधी:-बाळासाहेब सुतार 

       दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाचे कामकाज उत्कृष्टपणे चालू असून, दुध संघाची प्रगतीपथाकडे वेगाने वाटचाल सुरु आहे. आगामी काळात संघाचे दूध संकलन प्रतिदिनी एक लाख लिटर पर्यंत निश्चितपणे जाईल. आगामी काळ हा दूधगंगा दुध संघासाठी भरभराटीचा राहणार आहे, असे गौरोदगार भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले.

          इंदापूर येथे अर्बन बँकेच्या सभागृहात दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघांच्या वतीने आयोजित दूध उत्पादक शेतकरी आणि संकलन केंद्र प्रमुख यांना सानुग्रह अनुदान वाटप कार्यक्रम हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते उत्साही वातावरणात गुरुवारी (दि.20) संपन्न झाला. यावेळी रु. 50 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान वितरण करण्यात आले.एकूण 6452 शेतकरी दूध पुरवठा करणारे आहेत. यावेळी मार्गदर्शन करताना हर्षवर्धन पाटील बोलत होते.

            हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, दूध संघाची मजबुतीने प्रगतीकडे वाटचाल सुरु आहे, हे पाहून मनस्वी आनंद होत आहे. संघाच्या अडचणीचा काळ पूर्णपणे संपला आहे. सध्या संघाचे 48 बल्क कुलरच्या माध्यमातून दैनिक संकलन 35 हजार असून, प्रत्येक 10 दिवसाला दुध उत्पादक शेतकऱ्यांना नियमित पेमेंट केले जात आहे. सहकाराचे मंदिर असलेला दूध संघ आर्थिक अडचणीतून पूर्णपणे बाहेर आलेला आहे. दुध संघाचे संकलन वाढीसाठी नाबार्ड मार्फत लवकरच मेळावे घेऊन शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन वाढीचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे.

           जागतिक ब्रँड असलेल्या अमूल शी संघाचा करार झालेला आहे, त्यामुळे दूध संघ भक्कम झाला आहे. एका वर्षात संघाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावरती दूध पगाराच्या सुमारे 40 कोटीची रक्कम जमा करण्यात आली आहे. आपली शेतकऱ्यांशी नाळ जोडली आहे म्हणून हे शक्य झाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

        यावेळी भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी दूध संघावर कित्येक वर्ष चोहोबाजूने आलेल्या अडचणीना आपण कसे तोंड दिले व त्या अडचणींना आपण कसे पुरून उरलो हे अतिशय आत्मविश्वासाने सविस्तरपणे नमूद केले. राज्यात आपले युतीचे सरकार आल्यामुळे संघाची आणखी वेगाने भरभराट होईल, असा विश्वास व्यक्त केला. दूध संघाचे तत्कालीन अध्यक्ष कै. मंगेश पाटील यांच्या आठवणींचा हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात भावपुर्ण शब्दात उल्लेख केला. जीवाभावाचे सहकारी, निष्ठेने काम करणारा विश्वासू मित्र आपल्यात नसल्याची खंत भाषणाच्या प्रारंभी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली

         यावेळी उपाध्यक्ष उत्तमराव जाधव, डॉ.शैलेश मदने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

     प्रास्ताविक कार्यकारी संचालक प्रसाद गायकवाड यांनी केले.

 सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. कार्यक्रमास तालुक्यातील सर्व प्रमुख मान्यवर पदाधिकारी, दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट :-

इंदापूर तालुक्यातील धवल क्रांतीचे श्रेय दूधगंगाकडे – हर्षवर्धन पाटील.

 

सुमारे 25 वर्षापूर्वी दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघांने इंदापूर तालुक्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक जीवनात परिवर्तन झाले. इंदापूर तालुका हा राज्यात सर्वाधिक दूध उत्पादन करणारा तालुका ठरला. इंदापूर तालुक्यातील धवल क्रांतीचे श्रेय हे दूधगंगा सहकारी दुध संघाला आहे, असे गौरवगार भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी काढले.

 

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com