कूरखेडा-वडसा राष्ट्रीय महामार्गाला झूडपांचा वेढा… — झूडपांची छटाई करा शहर विचार मंचाची मागणी…

    राकेश चव्हाण

कूरखेडा तालुका प्रतिनिधि 

          ब्रम्हपूरी -वडसा-कूरखेडा-कोरची राष्ट्रीय महामार्ग क्र.५४३ अंतर्गत कूरखेडा ते वडसा दरम्यान रस्त्याचा दूतर्फा झाडे झूडपाचा वेढा पडल्याने हा मार्ग धोकादायक झाला आहे सदर मार्गावर वाढलेल्या झूडपाची छटाई करीत मार्गाला झूडपाचा वेढ्यातून मूक्त करण्यात यावे अशी मागणी शहर विचार मंच कूरखेडा यांचा वतीने राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे करण्यात आली आहे.

            कूरखेडा- वडसा मार्गावर गेवर्धा ते शंकरपूर या १२ कीलोमीटर अंतरावर घनदाड जगंल आहे या मार्गावर अनेक ठिकानी डांबरीकरण असलेल्या ठिकाणा पर्यंत झूडपांची वाढ झालेली आहे रस्त्यावर झूडपे आल्याने वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता बळावलेली आहे.

         तसेच सरळ मार्गावर सूद्धा समोरील वाहनास साइड देताना किंवा ओवरटेक करताना झूडपे वाहनावर धडकत असल्याने वाहना सह प्रवाशाना धोका पोहचत आहे.सदर अडचण लक्षात घेत तातडीने या मार्गारील झाडे झूडपांची छटाई करीत मार्गाला झूडपांचा वेढ्यातून मूक्त करण्यात यावे अशी मागणी भ्रमनध्वनीवर राष्ट्रीय महामार्गाचे शाखा अभियंता व उपविभागीय अभियंता कडे शहर विचार मंचाचे अध्यक्ष माधवदास निरंकारी मंचाचे बौद्धिक प्रकोष्ठ प्रमूख रविन्द्र गोटेफोडे वैद्यकीय प्रकोष्ठ प्रमूख डॉ.जगदीश बोरकर यानी केली आहे.