ऋषी सहारे
संपादक
देसाईगंज :- शहराच्या जुनी वडसा येथील चव्हाण वार्ड या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण निधीतून नाट्य सभा मंडप बांधकामाचे भूमिपूजन काल शुक्रवार २० सप्टेंबरला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. नाट्य सभा मंडप बांधकामाच्या माध्यमातून नाट्य रसिक प्रेमी तथा गावकऱ्यांना याचा लाभ मोठ्या प्रमाणावर होणार आहे. नाट्य रंगमंचाच्या माध्यमातून नृत्य, नाटक, खेळ, वेशभूषा स्पर्धा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करून रसिकांसाठी उपयोगी पडणार आहे.
भूमिपूजन प्रसंगी आमदार कृष्णा गजबे, भाजपा देसाईगंज शहराध्यक्ष सचिन खरकाटे, संतोष पत्रे, केशव राऊत, आसाराम पत्रे, अभिमन देवतळे, नरेश पारधी, शोभा पत्रे, आसाराम चौधरी, गजानन खरकाटे, तिलक राऊत,प्रल्हाद राऊत, तातोबा चौधरी, रामकृष्ण पत्रे, मधुकर पत्रे, गजानन बोकडे, मनोहर बोकडे व ग्रामस्थ उपस्थित होते.