रासेयो स्वयंसेवकानी चिमूर बसस्थानक केले प्लॉस्टिक मुक्त…

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

चिमूर स्थानिक गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय येथील रा से यो स्वयंसेवकांनी केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छता हीं सेवा अभियाना अंतर्गत दिनांक 17 सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

          या मध्ये महाविद्यालय परिसर स्वच्छता , प्लास्टिक निर्मूलन करण्यात आले. स्वच्छता अभियानाचा समाजात प्रचार प्रसार व्हावा याकरिता राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकानी चिमूर बसस्थानक परिसरातील प्लास्टिक पिशव्या, व कचरा गोळा केला. त्याचे कायम निर्मूलन केले.

         यावेळी चिमूर बसस्थानक आगार प्रमुख श्री वैभव धाडसे यांनी मार्गदर्शन केले. कचरा व्यवस्थापन म्हणजे काय, प्लास्टिक पिशव्याचा वापर तरुणानी करू नये. तसेच समाजाने प्लास्टिक वर बंदी आणण्यासाठी रासेयो नी पुढाकार घेतला पाहिजे असे सांगितले.

         सूत्रसंचालन रा से स्वयंसेवक सौरभ मस्के तर आभार समीर आत्राम यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन रा से यो विभागीय समन्वयक तथा कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.प्रफुल राजुरवाडे यांनी केले.

         या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. नितिन कत्रोजवार व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा गुणवंत वाघमारे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.