राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
कुरखेडा शहरात शनिवारी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या डॉ. शिलुताई चिमुरकर यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद परिवर्तन यात्रेच्या अंतर्गत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी 5 वाजता कुरखेडा बस स्टॉप येथून प्रारंभ झालेली ही रॅली किसान मंगल कार्यालयापर्यंत मोठ्या उत्साहात पार पडली.
रॅलीला स्थानिक नागरिक, शेतकरी, महिला , तरुण कार्यकर्ते आणि विविध समाज घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी रस्त्यांवर उभे राहून या रॅलीचे स्वागत केले, तर अनेकांनी रॅलीत सहभागी होऊन डॉ. चिमुरकर यांच्या सामाजिक कार्याला पाठिंबा दर्शविला.
जनसंवाद रॅलीच्या , शेतकऱ्यांच्या समस्यांपासून महिला सशक्तीकरण, शिक्षण आणि आरोग्य या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून कुरखेडा तालुक्यातील नागरिकांच्या समस्या थेट शासनापर्यंत पोहोचविण्याचा डॉ. शिलुताई चिमुरकर यांचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे, नवनाथ धाबेकर , युवा नेते पिंकू भाऊ बावणे, महादेवजी कुमरे आदिवासी संघ वडसा,पुस्पाताई कोहपरे महिला तालुका अध्यक्ष काँग्रेस कमेटी वडसा,गीताताई नाकाडे,देवा सहारे,सोमेश्वर वालदे आदी उपस्थित होते.