वाघाच्या दहशतीतुन शेतकरी शेतमजूर यांना संरक्षण देण्यासाठी २५ वनकर्मचारी तैनात… — वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कर्मचाऱ्याची गस्त सुरू.. — कॅमेरा डॅप लावून वाघाच्या हालचाली वर लक्ष.

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:-पारशिवनी वनपरिक्षेत्रातील गाव शिवारात वाघाने धुमाकूळ घातला असून दिं.१९ सप्टेंबरला पेठ परसोडी गावातील शेतकरी आपल्या म्हशी,भैरव परीसरात चारत असताना काल दुपारच्या वेळी अचानक पट्टेदार वाघाने जिवघेणा हल्ला चढवला होता.

         त्या हल्यात शेतकरी चंद्रकांत इंगळे हा गंभीर रित्या जखमी झाला असून सध्या नागपूर येथील मॅडेटि्ना रुग्णालय मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

       या परीसरातील ईटगाव चारगाव तामसवाडी भागेमहारी,पेठ परसोडी,पाला सावळी व ईतर गावांमध्ये वाघाने धुमाकूळ घातलाय.

      त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर मोठ्या प्रमाणावर दहशतीत असुन शेतकरी व शेतमजूर शेतात जाण्यासाठी हिंमतच करीत नसल्याने व वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करीत आहेत.

       वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांनी तात्काळ निर्णय घेऊन वाघाने धुमाकूळ घातलेल्या ग्रामीण व जंगला शेजारच्या गावातील नागरिकांना भयमुक्त करण्यासाठी व शेतकरी शेतमजूराना संरक्षण करण्यासाठी २५ अधिक वनकर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

      तैनात वन कर्मचारी दिवसा सकाळी व संध्याकाळी सदर परीसरात गस्त घालत आहेत.तर शेतकरी व शेतमजूर शेतात जाण्याच्या व वाटेवर संरक्षण करण्यासाठी व शेतात जाऊन फटाके वाजवून वाघाची दहशत कमी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम करून वाघाच्या दहशतीतुन शेतकरी शेतमजूर व नागरिकांना भयमुक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे.

       वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत व वनरक्षक सह महिला व पुरुष वनकर्मचारी तैनात करण्यात आले आहे,असे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांनी सांगितले.

***

परीसरात कॅमेरा डॅप लावून वाघाच्या हालचाली वर लक्ष केंद्रित…

    वाघाने धुमाकूळ घातलेल्या क्षेत्रात वनविभागाच्या वतीने जागोजागी कॅमेरे बसविण्यात येत आहे.

   त्यामुळे वाघाच्या हालचाली वर लक्ष केंद्रित करून घेण्यासाठी वनकर्मचारी करीत आहे.

***

नागरिकांना संरक्षण देणे हेच आमचे ध्येय…

    वनपरिक्षेत्राधिकारी अनिल भगत यांनी,’दखल न्यूज भारत तालुका प्रतिनिधी सोबत,बोलताना सांगितले की वाघाच्या रक्षणासाठी व नागरिकांना संरक्षण करण्यासाठी वनकर्मचारी सदैव कार्यरत आहेत.

      नागरिकांनी घाबरून जाण्यापेक्षा वनकर्मचारी यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

     नागरिकांनी शेतकरी व शेतमजूरानी आक्रमक पवित्रा घेण्यापेक्षा वनकर्मचारी यांना सहकार्य करावे असे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांनी आव्हान केले आहे.