पर्यावरण प्रेमींनी इंद्रायणी नदीपात्रातून शेकडो गणेश मूर्ती बाहेर काढल्या…

दिनेश कुऱ्हाडे 

    उपसंपादक

पुणे : गणेश विसर्जन दिवशी अनेक गणेशभक्तांनी पिंपरी चिंचवड हद्दीतील मोशी परीसरातील इंद्रायणीत मूर्ती विसर्जन केले. आधीच इंद्रायणी प्रदूषित होती. त्यात गणेश मूर्ती पाण्यात सोडल्या. यामुळे पर्यावरणप्रेमी आणि नदीप्रदूषणावर जनजागृती करणाऱ्‍या संस्थांनी एकत्र येत इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी मोशी येथे इंद्रायणी पात्राची स्वच्छता केली. नदीपात्रातून शेकडो गणेश मूर्ती बाहेर, विविध फोटो आणि कुजके कपडे बाहेर काढले. 

          दरम्यान, आळंदीतील इंद्रायणी सेवा फाउंडेशन, पिंपरीतील ग्रीन आर्मी, इंद्रायणी जलमित्र अशा संघटनांनी एकत्र येत इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी नदीची स्वच्छता केली. यामधे विठ्ठल शिंदे, प्रशांत राऊळ, प्रकाश जुकंटवार, विजय सूर्यवंशी, विपुल कासार, विजय शेवाळे, संदीप शर्मा, हरीश कुलकर्णी, राजेश भट, हरी अय्यर, जयसिंग भाट, गौतम कांबळे, श्रीकांत सावंत, सोमनाथ मोरे, विनायक लिमकर, संतोष मादर, नितीन गायकवाड, सचिन परुळेकर, रबिंद्रा झहा, राजेश पालवे, प्रकाश चक्रनारायण, प्रशांत कुलकर्णी, विजय सूर्यवंशी आणि मित्र मंडळी अभियानात सामील झाली होती.