मराठा समाजाच्या आळंदी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी :- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं सध्या उपोषण सुरु आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या त्यांच्या मूळगावी जरांगेंचं उपोषण सुरु आहे.

          आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. अशात राज्यातील मराठा समाजाकडून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे. ठिकठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाज कडून आज आळंदी बंदची हाक दिली गेली आहे. मनोज जरांगे यांच्या समर्थनात आळंदी बंदची हाक देण्यात आली आहे. यावेळी मराठा बांधवाकडून चाकण चौकातून आळंदी शहरात फेरी काढली होती. एक मराठा लाख मराठा च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. आरक्षण आम्ही घेणारच म्हणत रॅलीमधील आंदोलकांनी शहरातून फेरी काढली.

       मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज सकल मराठा समाज कडून आळंदी बंदची हाक देण्यात आली आहे.

            सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपापली दुकानं बंद ठेवली आहे.‌ अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. आळंदीकरांसह येथील सर्व व्यावसायिक यांनी सकाळी बंद पाळला. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

           सकल मराठा समाजाच्या वतीने केलेल्या आव्हानास आळंदीकरांनी सगळ्यानी बंद पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाद्वार चौक, शनि मंदिर रस्ता, भराव चौक, प्रदक्षिणा मार्ग, चावडी चौक, पालिका चौकातील दुकाने बंद होती.