कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी:- तालुक्यातील पाली उमरी या गावी आज दिनांक 22/9/2024 रविवार ला विश्र्वोदया मल्टी परपोज सोशियल सर्व्हिस सोसायटी तर्फे भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.
या प्रसंगी गट ग्राम पंचायत पाली उमरी घुकसी येथील नागरिकांना आरोग्य बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य तपासणी करून मोफत औषध देणयात आली.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने ग् गट ग्राम पंचायत चे सरपंच शुभम राऊत, उपसरपंच निकिता खोब्रागडे,पोलिस पाटील प्रल्हाद उरकुंडे, पोलिस पाटील मनोज प्रधान, अभिमन्यू राऊत, भूपेंद्र खोब्रागडे, सुरेश केवट प्रामुख्याने उपस्थित राहुन लोकांना शिबिरचा लाभ घेण्या साठी प्रोत्साहीत केले.
विश्र्वोदया मल्टी परपोज सोशियल सर्व्हिस सोसायटीच्या डाक्टर हिमानी, डॉ. भारती, सिस्टर जॉयसी, सिस्टर मार्सेलिना, सिस्टर रीना, सिस्टर अश्रीता, सिस्टर पुष्पा, ॲनिमेटर किरण, सुषमा , माधुरी, आशा वर्कर रंजना चिंचोलकर, वैदयकिय विद्यार्थीनी सिस्टर द्राक्षा, सिस्टर खुषी यानी रुग्णाना तपासुन मोफत औषध दिली.
याप्रसंगी पाली उमरी घुगसी व जवळ पासच्या गावातील रुग्णाची तपासुन औषध देण्यात आली. शिबिराचे संचालन सरपंच शुभम राऊत यानी केला तर गावातील उपसरपंचा निकिताताई खोब्रागडे यांनी सर्वाचे आभार मानले.