चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा:- आगामी लोकसभा निवडणुकीत नवीन चेहरा म्हणून तसेच भावी खासदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभय रंगारी यांची मुलाखत घेण्यात आली. या वेळी त्यांनी सांगितले की,आज समाजकारणाचा स्वरूप बदलून राजकारण झाले.परंतु राजकारणी हे फक्त राजकारण करतात.जनतेच्या कामाचे काय?
” आहे का अशी हिम्मत,इमानदारी,उत्तरदायित्व स्वीकारण्याची धमक एखाद्या लिडर मध्ये,किंवा पार्टी मध्ये “?
आगामी 2024 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराचे राजकीय परिवर्तनासाठी अनोखे पाऊल !
राजकीय नेते व त्यांच्या पक्षाचे उत्तरदायित्वान्वये बांधील राहण्यासाठी न भूतो,न भविष्यती प्रयोग !
राजकारणात एकदा निवडून आले की,त्यांच्या पिढ्या न पिढ्या सुखात पण मतदान करणारे व बदलाची अपेक्षा करणारे मतदार सदैव दुःखात कसे ?
पगारदार,नोकरदार 50 वर्षाचा झाल्यावर तो सक्षम आहे किंवा नाही ? हे पाहण्यासाठी नियम आहेत ,पण राजकारणी 80 वर्षांचा होईल व त्याचे दात पडतील तरी त्यांची सक्षमता तपासण्याचा नियम नाही, राजकारण्यांची मुले राजकारणी बनतात,एकदाच निवडून आले तरी अब्जाधीश कसे बनतात ?
इकडे माणसाचा स्वभाव माणूस मरे पर्यंत बदलत नाही,पण राजकारण्यांची विचारधारा मात्र एका झटक्यात बदलते ,आज रात्री हे ज्या पक्षात झोपले त्याच पक्षात सकाळी उठतील का ? हे खात्रीपूर्वक त्यांना स्वतःही सांगता येणार नाही.
कालपर्यंत ज्या विचारधारेला व पक्षाला यांनी शिव्या दिल्या,अचानक त्या पक्षात प्रवेश करून त्या पक्षाची थोरवी गातांना राजकारणी आपल्याला दिसतील!नैतिकता, नियम,निस्वार्थ सेवा,निष्पादन हे सर्व तुमच्या -आमच्यासाठी आहेत.राजकारण्यांना हे लागू होत नाही,पण हे सर्व त्यांना विचारणार कोण?आणि हेच प्रश्न विचारण्याची धमक असणारे “”अभय डी.रंगारी “” यांनी ही सुरुवात स्वतःपासून करून अनोखे पाऊल उचलले आहे.
आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले की येणाऱ्या 2024 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत ते उमेदवार म्हणून “”भंडारा – गोंदिया “”लोकसभा क्षेत्रातुन किंवा देशातील अन्य कोणत्याही लोकसभा क्षेत्रातुन निवडणूकीला उभे राहणार आहेत.एवढेच नव्हे तर ते “”स्टॅम्प पेपर”” वर “”समस्या आणि समाधान कार्ड “” नावाखाली निवडणूक जाहीरनामा घोषित करणार आहेत.
त्यात ते देशातील ज्वलंत मुद्दे तर घेतलीच मात्र राजकीय नेते व त्यांच्या पक्षात भूकंप येईल असे पाऊल उचलणार आहेत , ते पाऊल असे की , त्यांची म्हणजे “”अभय डी. रंगारी “” यांची जी संपत्ती आहे ,मग ती चल असो किंवा अचल संपत्ती असो,त्या सर्व संपत्ती वर स्टॅम्प पेपरच्या माध्यमातून बोझा चढविणार आहेत ,ते अश्या प्रकारे की ,जर लोकसभा निवडणुकीत “”अभय डी.रंगारी “” निवडून आले आणि त्यांनी जर स्टॅम्प पेपर वर जो जाहीरनामा घोषित केला होता , तो पाच वर्षात पूर्ण केला नाही तर , “”अभय डी.रंगारी “” यांची जेवढी संपत्ती आहे,ती सरकार जमा होईल किंवा त्या संपत्ती वर त्या क्षेत्रातील मतदारांचा अधिकार राहील,असे ते स्टॅम्प पेपर वर लिहून देऊन मगच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात मतदारांच्या रणांगणात मतदारांना मत मागण्यासाठी फिरणार आहेत.
आमच्या प्रतिनिधी ने अभय डी.रंगारी यांना विचारले असता,की आपण हे असे पाऊल का उचलले ? त्यावर ते म्हणाले की,जर एखाद्या नोकरी वाल्याला आपण ज्या पदावर नियुक्त करतो,त्या पदावर त्याने काम नियमानुसार केले नाही तर आपण त्यांना त्या पदावरुन बडतर्फ , डीमोशन , कार्यमुक्त , पदमुक्त करतो ,एवढेच नव्हे तर त्याने जर आर्थिक घोटाळा केला असेल तर त्याच्या पगारातून ,संपत्तीतुन ती भरपाई घेतली जाते , मात्र राजकारणी लोकांवर असे कोणतेच बंधन नाही ,त्यामुळे ते निवडणूकित खोटे दावे करून मतदारांची दिशाभूल करून मतदान घेतात.
मात्र,निवडून आल्यावर ते फक्त स्वतःची आर्थिक उन्नती कशी होणार याकडे लक्ष केंद्रित करून मतदारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात , तसेच त्यांची संपत्ती ही निवडून आल्यावर हजार पटीने ,लाख पटीने कशी वाढते? हे संशोधनाचे विषय आहेत,त्यांनी जर जनतेचे काम केले नाही तर त्यांची हजार पटीने,लाख पटीने वाढणारी संपत्ती ही सरकार जमा किंवा मतदाराच्या हवाली करायला पाहिजे.
जेणेकरून निवडून येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला वाटेल की , आपण जर जनतेचे कार्य निवडून आल्या नंतर केले नाही तर , आपली संपत्ती सरकार जमा किंवा मतदारांच्या वाट्याला जाईल ,अशी भीती निर्माण होऊन निवडून येणारे नेते हे जनतेला खोटे आस्वासन न देता , जे कार्य ते पूर्ण करू शकतात व जनता आणि देश हिताच्या कार्याची घोषणा किंवा जाहीरनामा करतील.
त्यामुळे कोणतेही नेते किंवा पार्टी खोटा जाहीरनामा किंवा आस्वासन देणार नाही .यासाठीच असे पाऊल उचलणे गरजेचे आहे , मात्र आजघडीला कोणतीही पार्टी किंवा कोणताही नेता यासाठी तयार होणार नाही , याची अभय डी रंगारी यांना जाणीव आहे, खात्री आहे , म्हणून कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात ही स्वतः पासून करावी , अशा विचारधारेला मानणारे अभय डी रंगारी यांनी ही सुरुवात स्वतः पासून करण्याचे ठरवून , या येणाऱ्या 2024 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत खंबीरपणे उभे राहून सामना करावा अशी इच्छा मनाशी बाळगूण हे अविस्मरणीय व लोकशाहीला आर्थिक पारदर्शक करण्यासाठी उचललेले पाऊल हे राजकीय इतिहासात एक मैलाचे दगड ठरणार आहे .
प्रतिनिधीने माहिती काढली असता “”अभय डी.रंगारी “” यांची अंदाजे संपूर्ण चल अचल संपत्ती ही शेतजमीन , घरे , प्लॉट , सोना ,चांदी , शेअर , बँक बॅलन्स , रोख रक्कम , कॉऊ फॉर्म- जनावरे , व इतर सर्व मिळून अंदाजे { 3 ते 4 कोटी } तीन ते चार कोटीच्या जवळपास आहे.ही संपत्ती कमी जास्त होऊ शकते. ही सर्वच्या सर्व संपत्ती ते निवडणूक जाहीरनाम्यात नमूद करून,निवडून आल्या नंतर जनतेला आस्वासन दिलेल्या कामाची जर पूर्तता केली नाही तर ही वरील सर्व संपत्ती सरकार जमा होईल किंवा त्यावर मतदारांचा हक्क असेल असे ते बोलतात.
मात्र,येणारा काळच सांगेल की, हा प्रयोग जनतेच्या दरबारात किती यशस्वी होतो किंवा नाही .मात्र या अशा प्रकारच्या निर्णयामुळे जे सद्यस्तिथीत आज घडीला राजकारणात सक्रिय असून ज्यांनी अनंत माया जमविली आहे व जे खोटे आस्वासन देऊन जनतेला मूर्ख बनवितात त्यांना मात्र अशा अनोख्या प्रयोगाने चांगलीच धडकी भरली आहे!
जर हा प्रयोग यशस्वी झाला तर ,अशाच प्रकारचा राजकीय पक्षांना व राजकीय नेते मंडळी यांच्या साठी कायदा किंवा नियम भविष्यात बनू शकतो , हे मात्र निश्चित , पण त्यासाठी जागरूक मतदारांनी सदैव तत्पर राहून आपल्या हक्क व अधिकारांची प्राणपणाने जपवणूक करावी लागेल , बाकी सर्व येणाऱ्या काळावर अवलंबून आहे .
या अगोदर “”अभय डी रंगारी “” जिल्हा परिषद निवडणूकित , आमगाव जिल्हा परिषदचे उमेदवार म्हणून अशाच प्रकारचा “”स्टॅम्प पेपर “” वर जाहीरनामा “”समस्या आणि समाधान कार्ड “” घोषित केला होता.
त्यात ते जनतेला आकर्षित करण्यात फार यशस्वी झाले होते , आणि जनतेला ही हा प्रयोग मनापासून आवडला होता.संपूर्ण जिल्हा भरच नव्हे तर संपूर्ण भारत देशात व ज्या ज्या देशात लोकशाही आहे त्या त्या देशात या प्रयोगाची स्तुती करण्यात आली होती . त्यावेळी “”अभय डी रंगारी “” यांनी राष्ट्रीय पार्टी “”बहुजन मुक्ती पार्टी “”BMP”” या स्टॅम्प पेपर वर जाहीरनामा घोषित करणाऱ्या पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती .
“”अभय डी.रंगारी “” हे सुप्रसिद्ध कवी असून “”मिठा झूठ , कडवा सच “” या प्रकारच्या राजकीय , सामाजिक , व पर्यावरणिय कविता लिहितात , त्यांचे दोन कविता संग्रह प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत.
त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत,त्यात राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारा चा समावेश आहे ,तसेच ते मुक्त पत्रकार , लेखक , राजकीय विश्लेषक , समाजसेवक , सामाजिक कार्यकर्ते , व आज घडीला “”बहुजन मुक्ती पार्टी “”BMP “” या राष्ट्रीय पार्टी च्या भंडारा जिल्ह्या कार्यकारिणी चे सदस्य व मीडिया प्रभारी या पदावर कार्यरत आहेत.
तसेच कोणतीही जनतेची समस्या असो त्यात ते आंदोलनाच्या स्वरूपात भाग घेऊन त्या समस्या चे निराकरण शासन दरबारात तत्परतेने करतात .
अभय डी. रंगारी यांच्या मित्र परिवारात अशी चर्चा आहे की , अभय हे मेष राशी चे असून मेष राशी ही राजकीय नेतृत्व करण्यात सक्षम असते.तसेच एकदा पान टपरीवर अभय डी रंगारी यांना पाहून एका साधू संन्यासाने वर्तविले की , ही व्यक्ती राजकारणात आमूलाग्र ऐतिहासिक स्वरूपाचे बदल घडवून आणेल .आणि आज घडीला ते खरे होतांना दिसत आहेत.
अभय यांच्या दोन्ही हातावरील रेषेची अशी जोडणी आहे की त्या रेषेच्या जोडणी मुळे हातावर “”स्वस्तिक “” चिन्हा सारखी आकृती निर्माण होते ,असेही त्या साधू संन्यासाने सांगितले.याविषयी त्याच्या मित्रपरिवार कुतूहल पूर्ण विशेष चर्चा आहे .
अभय डी.रंगारी हे राजकीय निरक्षरतेला मिटविण्यासाठी राजकारणात सक्रीय झालो असे म्हणतात , कारण त्यांच्या मते राजकीय अजाणतेपणामुळे देशाचे वाटोळे झाले आहे ,असे त्यांचे ठाम मत आहे .याला पुष्टी देण्यासाठी ते महान विचारवंत “” बरतोलत ब्रेखत”” यांच्या विचारांचे स्पष्टीकरण देतात ,यांच्या मते , “”सर्वात भिकार निरक्षर कुणाला म्हणावं तर राजकीय निरक्षराला , कारण तो ऐकत नाही , बोलत नाही , राजकीय प्रकियेत सहभागी होत नाही , त्याला कळत नाही की , जगण्याची किंमत , डाळीचे भाव , मासळीचे दर , पिठामिठाची किंमत , घरभाडे , जोड्याची किंमत , औषधी च्या किमती सारं काही राजकीय निर्णयावरून ठरतं , मात्र याकडे राजकीय निरक्षर जाणीव पूर्वक दुर्लक्ष करतो , व या आपल्या राजकीय अजाणतेपणाचा त्याला अभिमान सुद्धा वाटतो , आणि छाती फुगवून तो सांगत राहतो की , मी राजकारणाचा द्वेष करतो , त्या राजकीय बेअक्कल माणसाला हे कळत नाही की , त्याच्या राजकीय अज्ञानातूनच जन्माला येते वेश्या , बेवारस मूल , दरोडेखोर , आणि सर्वात वाईट म्हणजे भ्रष्ट अधिकारी , शोषणकारी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्याचे तळवेचाटू राजकीय नोकर ,आणि पाखंडी राजकारणी “”
देशातील राजकारणाला बदलावयाचे असेल तर सर्व प्रथम जनतेला , मतदारांना बदलावे लागेल , कारण कोणताच नेता किंवा कोणतीच पार्टी ही जनतेचे हित करत नाही.
मात्र,एकमेकांना शिव्या देणारे नेते हे स्वतःच्या हिताचे कायदे करतात , तसेच एखादा इमानदार नेता असेल तर त्याला मारणे , बदनाम करणे , किंवा विकत घेऊन आपल्यात सामील करून जनतेला धोका देतात , हे होऊ नये म्हणून संपूर्ण जनतेनेच राजकीय इमानदार व्हावे , जेणेकरुन संपूर्ण जनतेला कोणी नेता किंवा पार्टी बदनाम करू शकत नाही , किंवा विकत घेऊ शकत नाही , यासाठीच “”अभय डी रंगारी “” याचे हे पाऊल आहे .
सर्व सामान्य चोर हा धनदौलत , बॅग , घडी , सोने चांदी इत्यादी चोरेल , मात्र “”राजकीय चोर “” हा सर्वाचे भविष्य , शिक्षण , आरोग्य , निवारा , अन्न ,वस्त्र , रोजगार , व्यापार चोरतो , म्हणून सर्वसामान्य जनतेने जागरूक राहणे गरजेचे आहे.
राजकारणाची परिभाषा तेव्हाच बदलेल,जेव्हा येणाऱ्या काळातील नेतृत्व हे प्रस्थापित घराण्यांच्या बंगल्यावर नव्हे तर शेताच्या बांधावरून निर्माण होतील,सर्व गुण संपन्न नेत्यांमध्ये काही गुण हवे असतात ते अशाप्रकारे
INTE “L” LGENT
HON “E” ST
CRE “A” TIVE
CONFI “D” ENT
DRIV “E” N
COU “R” AGEOUS
LEADER लिडर !
मात्र वरील चित्र न दिसता वेगळेच चित्र आज बघायला मिळते , ते असे की , देशातील 4033 आमदारा पैकी 4001 आमदारांच्या प्रतिज्ञापत्र अनुसार त्यांच्या कडे 54,545 कोटी रुपये ची संपत्ती आहे , 84 राजकीय पक्ष आणि अपक्ष असलेल्या या आमदारांची सरासरी संपत्ती 13.66 कोटी रुपये आहे.
सगळ्या आमदारांच्या संपत्ती चा विचार केल्यास ही संपत्ती नागालँड,मिझोराम , आणि सिक्कीम या तीन राज्याच्या वर्ष 2023 -2024 च्या एकत्रित अर्थ संकल्पापेक्षा अधिक आहे . म्हणून जास्त विचार करणे बंद करा आणि त्या जगाच्या बाहेर या जो वास्तविकतेमध्ये आहेच नाही , आणि चुकीच्या गोष्टीचा विरोध उघडपणे खुलेआम करा , मग तो राजनीती मध्ये असो किंवा समाजामध्ये , कारण इतिहास आवाज उठविणारांचा लिहिला जातो , तळवे चाटणारांचा नाही . सत्य बोलण्यासाठी हिम्मत लागते आणि ते साबीत करण्यासाठी सबूत लागते .
जे लोक अधिकाराच्या लढाईत – संघर्षात घाम गाळत नाहीत , तेच लोक अधिकार समाप्त झाल्यावर अश्रू गाळतात . क्रांती ही काही महालातून होत नाही , तर ती होते गरिबांच्या झोपडीतून , कारण महालात राहणारांच्या समस्याच नसतात , समस्या असतात ते फक्त झोपडीत राहणारांच्या. ताकत त्यांनाच मिळते , ज्यांच्या मध्ये हिम्मत करण्याची हिम्मत असते , विद्रोहासाठी सामर्थ्याची प्रतीक्षा करू नका , कोणाला माहीत , विद्रोह केल्यानेच सामर्थ्य येईल ! शेवटी अभय डी रंगारी यांनी काव्य शैलीत देशासाठी काय करायचे आहे हे सांगितले .
“” हर सामाजिक समस्या का , समाधान बन जाऊ !
जरूरतमंदो की जरूरत का , सामान बन जाऊ !
बन के नेता नेतागिरी करणे का , शौक नहीं मुझे !
चाहत है समाजसेवा का ,
दुसरा नाम बन जाऊ ! “”