चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
साकोली:-
येथील कृष्णमूरारी कटकवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेनंतर्गत जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लब तर्फे पावसाळी पक्षी व फुलपाखरे निरीक्षण कार्यक्रम नवतलाव परिसरात घेण्यात आला.
यावेळी ग्लोबल नेचर क्लबचे संघटक प्रा.अशोक गायधने,निसर्गमित्र युवराज बोबडे, गोविंदा धुर्वे,रोशन बागडे सौरभ राऊत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे स्थानिक व स्थलांतरीत पावसाळी पक्ष्यांचे तसेच फुलपाखरांचे दर्शन घडविले.
अधिक माहिती देताना प्रा. अशोक गायधने यांनी पावसाळ्यात आढळत असलेले ड्रोनगो कुक्कु व क्रेस्टेड पाईड कुक्कु हे विदेशातून भारतात केव्हा व कसे येतात तसेच त्यांच्या वर्तनसवयी यावर रोचक माहिती पुरविली. पक्षी व फुलपाखरे निरीक्षण करताना सहभागी विद्यार्थ्यांना 30 प्रकारचे पक्षी व 15 प्रकारचे फुलपाखरू तसेच विविध प्रजातीचे चतुर,कीटक वनस्पती यांचे दर्शन घडले. यामध्ये साधी साळुंकी, लहान बगळे, गायबगळे, सातभाई,घरकावळे,जंगल कावळे,काळा कोतवाल,पिठोरी कवडी, भारतीय दयाळ,पाईड मैना, विटकरी चंडोल, ठिपकेवाली मुनिया,पांढऱ्या कंठाची मुनिया,कापशी घार,काळा कंकर,करकोचा,टिटवी,लहान पाणकावळा, खंड्या,जांभळा करकोचा,चांदी बदक,उघड्या चोचीचा बलाक तसेच साधी मैना, ब्राम्हणी मैना,लालबुड्या बुलबुल,करडा धनेश इत्यादी पक्षी तर प्लेन टायगर, लिंबाळी,निलपरी राज्य फुलपाखरू, कॉमन रोझ,ब्यारोनेट ,तसेच विविध 8 जातीची ड्रॅगनफ्लाय चतुर कीटक,राज्यफुल जारूल,राज्यफुलपाखरू ब्लू मोरमान निलपरी व विविध वृक्षप्रजाती यांचे दर्शन घडले.
पक्षीनिरीक्षणानंतर सर्वांना नुकतेच पकडलेले विषारी बिनविषारी साप दाखविण्यात येऊन त्यांचा परिचय सर्वांना करून देण्यात आला.यानंतर स्व.शुभम बघेल व स्व.प्रोफेसर बहेकार यांना मौन श्रद्धांजली वाहण्यात आली.गडबड्या महादेव येथे शुभम बघेल स्मृती पाणवठा येथे द्वितीय स्मृती प्रित्यर्थ वृक्षारोपण करून निसर्गमित्रांद्वारे स्व.शुभम बघेल आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता,युवराज बोबडे, गोविंदा धुर्वे, प्रा.शीतल साहू, पूर्वा बहेकार, रुनाली निंबेकर, रोहिणी भैसारे,श्रावणी खोब्रागडे, पूजा अग्रवाल,ऋतुजा गहाणे,गुंजन घरत,तृषा जांभुळकर,अथर्व बहेकार,श्रावणी खोब्रागडे, टिकेश्वरी हरणे, हिना आंबेडारे,आकांशा तागडे, मृणाली बोरकर, रागिणी कांबळे,भुमेश्वरी लांजेवार,पंकज चौधरी यांनी सहभाग नोंदवून यशस्वितेकरिता परिश्रम घेतले.