ऋषी सहारे

संपादक

 

आरमोरी- पत्नीला जीवे ठार मारणाऱ्या पतिस न्यायालयाने केली जन्मठेप व दंडाची शिक्षा, सविस्तर वृत्त असे की , मृतक कल्पना व तिचे पती प्राणवल्लभ राधाकान्त राजवंशी , वय 47 रा . पी.व्ही . 26 मायापुर ता . पांखाजुर जि . कांकेर छत्तीसगढ़ यांचे दोघाचे दुसरा विवाह झालेले असुन मृतक कल्पनाचे पहीले लग्णापासुन एक मुलगा सुरज आणि प्राणवल्लभ यांचे पासुन झालेले मुलगा अभिजित असे चार जण एकत्र राहत होते . हे चारही जण डिसेंबर 2012 मध्ये देऊळगांव ता . आरमोरी येथील भाउराव दहिकर यांचे शेतामध्ये टरबुज उत्पन्न काढण्यासाठी आले व तिथेच शेतात झोपडी बनवून राहत होते . होळीच्या सणाचे निमित्याने 10 दिवस पहिले दोन्ही मुंल सुरज , अभिजित बापा सह पांखादूर येथे निघून गेले . दिनांक ०८/०४/२०१३ रोजी यातील फिर्यादी नामे नरेंद्र मोतीराम बनपुरकर रा . देऊळगाव याने अशी फिर्याद दिली की , भाऊराव महादेव दहीकर यांचे शेताजवळील तुळशिराम शेंडे यांचे शेतातील तणसीचे ढिगाजवळ एका महिलेचा सांगाळा पडलेला आहे . व सदर प्रेत हे भाऊराव दहिकर यांचे शेतातील झोपडी मध्ये राहणारी बंगाली महिला नामे कल्पना रा . नंबर २६ पाखांदुर राज्य छत्तीसगड ही अंदाजे एक महीण्यापासून बेपत्ता असून तिचेच प्रेत असावे असा संशय वरुन पोस्टे आरमोरी येथे तोंडी रिपोर्ट दिल्याने पोस्टे आरमोरी अकस्मात मृत्यू खवरी क्र . १२/२०१३ कलम १७४ जा . फो . नुसार गुन्हा नोंद करून सपोनी रविंद्र डी . पाटील यांनी तपास हाती घेतला . यातील फिर्यादी नामे मनोहर महानंद बिश्वास वय ३० वर्ष रा नंबर २६ पाखांदुर राज्य छत्तीसगड यांनी आपले फिर्याद मध्ये असे सांगीतले की , आरमोरी पोलीसांनी दिनांक ८/४/२०१३ रोजी घटणास्थळी मिळालेल्या स्त्री जातीचा मानवी सांगाडा त्याची बहीण नामे कल्पना राजवंशीचा असु शकतो . तसेच त्यास मयताचे सांगाडयाचे फोटो दाखविले असता सांगाडयाचे हातात असलेल्या बांगडया , नाकातील नथ , गळयातील काळा धागा आहे ते माझी बहीण नाम कल्पना हिचेच आहेत तसेच फोटोत जो काही थोडा चेहरा दिसतो आहे त्यावरुन सांगाडा हा त्याची बहिण नामे कल्पना राजवंशी हिचाच आहे व तिचा मृत्यू झाला आहे . माझी बहीण कल्पना व तिचा पती यांचा दोघांचाही हा दुसरा विवाह होता माझी बहीण कल्पना यांचे दुचाकी खरेदी माझे नावावर का खरेदी केली नाही ? तसेच कल्पना हिचे चरित्रावर संशय घेत होता कल्पना हिचे मृत्यूपासून प्राण याचा मोबाईल बंद येत आहे व तो गावी परत देखील आलेला नाही व आमच्याशी संपर्कदेखील साधलेला नाही . म्हणून नमुद आरोपी प्राणवल्लभ राधाकान्त राजवंशी यानेच माझी बहीण कल्पना यास जिवानिशी ठार मारुन तीचा मृतदेह तणसाचे ढिगात लपवून पळून गेलेला आहे . अशा फिर्यादवरून पोस्टे आरमोरी अप क्र . 21/2013 कलम -302,201 भादवी अन्वये आरोपी विरुध्द सदरचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला प्राणवल्लभ 4 तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की , मार्च २०१३ मध्ये भाउराव दहीकर चे शेतात झोपड़ी मध्ये यातील आरोपी व त्याची पत्नी कल्पना सोबत असतांना रात्री ८.०० ते ८.३० दरम्यान यातील आरोपी नामे प्राणवल्लभ राधाकान्त राजवंशी यांनी त्याचे पत्नी मृतक नामे कल्पना हिच्याशी झगडा भांडण करुन नायलॉन रस्सीने तिच्या गळा आवळून मारुन टाकला व तिचे प्रेत तणशिच्या ढिगा – यात लपवून ठेवला . 

आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने मा . न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले . फिर्यादी व वैद्यकीय पुरावा , ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राहय धरून दिनांक 22/09/2022 रोजी आरोपी नामे प्राणवल्लभ राजवंशी वय 47 वर्ष रा . रायपुर यांना मा . प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय बा . शुक्ल गडचिरोली यांनी आरोपिस कलम 302 भादवी मध्ये आजन्म कारावास व 10,000 / – रूपये दंड तसेच कलम २०१ भादवी मध्ये ३ वर्ष सश्रम कारावास व ५,००० / – रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली . सरकार पक्षातर्फे सहा . जिल्हा सरकारी वकील एस . यु . कुंभारे यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हाचा तपास पोनि / महेश हंबीरराव पाटील यांनी केला आहे . तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले आहे .

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com