पारशिवनी- -आज दिनांक 22/09/2022 वार गुरूवार रोजी नगरपंचायत पारशिवनी कार्यालय सभागृहात विविध विषय समित्यावर सभापती निवड व स्थायी समिती गठन बाबत मा . उप विभागिय अधिकारी वंदना सवरंगपते यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली . या सभेत मा . उप विभागिय अधिकारी वंदना सवरंगपते मॅडम , मा . मुख्याधिकारी अर्चना वंजारी मॅडम , मा . नगराध्यक्षा सौ . प्रतिभा संजय कुंभलकर मॅडम , मा . उपाध्यक्षा सौ . माधुरी शामराव भिमटे व इतर , नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते .

 सदर सभेत अनिता प्रमोद भड यांची पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती च्या सभापती व आशा रमेश वैद्य यांची बांधकाम नियोजन , विकास समिती च्या सभापती पदी बिनविरोध निवड झाली . तसेच स्थायी समितीचे नियमाप्रमाणे गठन करण्यात आले . सभा शांततेने पार पडल्याबद्दल पिठासिन अधिकारी तथा उप विभागिय अधिकारी रामटेक यांनी सर्वांचे आभार मानुन सभा संपल्याचे जाहीर केले .

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com