प्रेम गावंडे

उपसंपादक

दखल न्युज भारत

 

 

               १७ सप्टेंबर २०२२ रोजी मॅकरून स्टूडेंट अकॅडमी वडगांव,चंद्रपूर या शाळेत शिक्षण घेत असलेली १२ व्या वर्गातील विद्यार्थीनीने आपल्या खाजगी कामाकरीता प्राचार्याला सुट्टी मागितली असता प्राचार्याने तिला सुट्टी न देता उलट अश्शील शिवीगाळ करून अपमानित करण्याचा प्रयत्न केला.हा अपमान तिला सहन न झाल्याने त्या विद्यार्थीनीने त्याच शाळेच्या पहिल्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.यात तिला गंभीर स्वरूपाचा इजा होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेला आहे.

       सध्या तिच्यावर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू असून प्रकृती चिंताजनक आहे.हा संपुर्ण संतापजनक प्रकार दाबण्याचा प्रयत्न संस्थापक अध्यक्ष,प्राचार्य आणि कर्मचाऱ्यांनी केला असल्याचा आरोप तक्रार कर्त्यांचि आहे व 

       एवढा गंभीर घटनाक्रम घडला असतांना अजून पर्यंत या प्रकाराची कुठलीही तक्रार पोलिस ठाण्यात करण्यात आलेली नसुन संपुर्ण प्रकार बंदिस्त व्हावा या करीता शाळा व्यवस्थापनाची धडपड सुरू आहे काय?या संबंधाने महाराष्ट्र शासन स्तरावरावरुन तात्काळ चौकशी होणे आवश्यक असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

      परंतु राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून श्री.संजय ठाकुर यांनी सदर मुलीला न्याय मिळावा व दोषींवर कडक कार्यवाही करावी या आशयाचे निवेदन काल चंद्रपूर जिल्हाधिकारी डॉ.अजय गुल्हाणे आणि आज चंद्रपूर पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांना दिली व सात दिवसांच्या आत जर कार्यवाही करण्यात आली नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

             सदर शिष्टमंडळात प्रियदर्शन इंगळे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग चंद्रपूर,सतिश मिनगुलवार जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विमुक्त जाती-जमाती मागासवर्गीय सेल,प्रदिप रत्नपारखी माजी शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर,किसन अरडळे माजी ग्राम पंचायत सदस्य, प्रवीण आरपेल्ली, विजय डोर्लीकर, कुणाल ठेंगरे रा.वि.कॉ महासचिव, निखिल दुर्योधन तालुका उपाध्यक्ष रा.कॉ.पा, कार्तिक निकोडे, हिमांशू गुडघे, चिराग ठेंगरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com