संजय टेभुर्णे

कार्यकारी संपादक

 दखल न्यूज भारत 

 

     आज दिनांक 21 सप्टेंबर रोज बुधवार ला ग्रामपंचायत लवारी येथे बाल विकास प्रकल्प साकोली बीट विर्सी अंतर्गत पोषण माह अभियान घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल किरणापुरे पं. स. सदस्य प्रमुख पाहुणे गायत्री टेंभुणे सरपंच,विद्या कापगते ग्रा.प. सदस्य.निता कापगते,शालु कोसरे, सविता गोटेफोडे,लीला कापगते,रूपाली इरले, पुष्पा कापगते, प्रभा निखारे, रमा निखारे ,किरण किरणापुरे, तारा ईरले, चंद्रभागा लांजेवार, प्रमिला कुंभारे ,सुषमा चोपकर,लता लांजेवार, पुष्पा वाढई,क्षुती महाजन, पिंकी मोरस्कर, इशिका निखारे, उमेद पदाधिकारी, गरोधर महिला,स्तनपान महिला, किशोरवयीन मुली व गावातील सर्व महिला उपस्थित होते. 

अध्यक्ष भाषणात अनिल किरणापुरे म्हणाले की,बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे जन्माला आलेले बाळ मोठेपणी कसे असेल हे लहानपनातच कळते. असे म्हटले जाते कि अभिमन्यू ने आईच्या गर्भातच चक्रव्यूह भेदण्याची कला शिकला होता त्यामुळे तो चक्रव्यूह भेदू शकला. उगवलेल्या रोपट्याला पाणी खत कीटकनाशके, सूर्यप्रकाश वेळेवर मिळाले कि हातात येणारे पिक सोन्यासारखेच असते. नवजात बालकाचे देखील असेच आहे. सुरुवातीचे १२ महिने त्याच्या शारीरिक बौद्धिक,आणि मानसिक विकासासाठी फार महत्वाचे असतात, ज्यावर त्याचे भविष्य रेखांकित असते. तसेच गर्भवती महिलांना, स्तनपान महिलांना, बालसंगोपन करताना तांदूळ आणि मूग डाळ धुवून , भाजून बारीक करून त्या पीठाचे अनेक पदार्थ करता येतात. मऊ खिचडी, तुपात भाजून गोड शिरा, उपमा सारखं भाजी घालून इत्यादी. बाहेरचा रवा देण्यापेक्षा जास्ती चांगले. मुगाची डाळ पचायला हलकी आणि प्रथिने युक्त असते. तसेच गुलाबी मसूर डाळ मऊ शिजवून तूप मीठ जिरे पूड घालून खूप स्वादिष्ट होते. भरपूर प्रथिने त्यात असतात.

खरं तर आई आणि दोन आज्या यांना खूप माहीत अस्त. फक्त लहान बाळांना भरपूर प्रथिने द्यायला पाहिजे. त्यांना वाढीसाठी भरपूर प्रथिने लागतात. म्हणून डाळी, दूध, अंड्याचा पांढरा बलक, बदामाची बारीक पूड करून अगदी 2 चिमुट घालणे विविध पदार्थात असे देणे गरजेचे आहे.

भाज्या आणि फळे देखील अतिशय जरूरी असतात. अनेक फळे आणि शिजवलेल्या भाज्या मुलांना स्वतः खाण्याची सवय लावण्यासाठी बारीक तुकडे करून देता येतात की ते स्वतः खायला लागतील. मुलांना त्यांनी गचाळपणा केला तरी स्वतः खाऊ द्यावे. मनुके देता येतात स्वतः खाण्यासाठी. मुरमुरे तर अतिशय उत्तम. हळूहळू बोटांनी उचलून खातात.

पोळीच्या कणकेत अगदी किंचित थोडेसे बेसन घालून पोळ्या करता येतात. तूप लावून तुकडे करून दिले की अर्धे जमिनीवर पण अर्धे पोटात जातात. जर पचत असेल तर सोयाबीन चे पीठ, नाचणी पीठ, अशी विविध पीठे घालून छोट्या छोट्या पोळ्या बाळांना देऊन हाताने खायची सवय लावू शकतो.

प्लास्टिकच्या थाळीत एकीकडे भाजी, एकीकडे पोळी, थोडे मुरमुरे असे देऊ शकतो. फेकाफेकी होणार, थाळी उलटी करून सारावसरव होणार, घरात घाण होणार पण एका जागी बसून हाताने खायची सवय सगळ्यांच्या बरोबर बसून खायची सवय लागते.अशा प्रकारे मार्गदर्शन करते वेळी बोलत होते. कार्यक्रमात पोषण आहार स्टाल, लावण्यात आले,मुलांचे वजन करून बक्षीस वितरण करण्यात आले ,गीत गायन करून बाळाचे संगोपन करताना आपले अनुभव काही महीलानी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्पा कापगते,प्रास्ताविक रमा निखारे, आभार प्रभा निखारे यांनी केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com