ऋषी सहारे
संपादक
कुरखेडा- दि. 20/09/2022 रोज मंगळवारला कुरखेडा तालुक्यातील नवरगावात अनुलोम संस्थेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अभिवादन सोहळा घेण्यात आला. या कार्यक्रमाला गावकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळला असून सदर कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून गावचे पोलीस पाटील नाकाडे म्याडम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अनुलोमचे वस्तिमित्र स्वप्नील पिल्लारे, स्थानमित्र जगदीश मानकर व अनुलोम चे उपविभाग प्रमुख अमित मोरांडे अनुलोमचे भाग प्रमुख इंदेश्वर साहारे व अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुलोमचे भाग प्रमुख इंदेश्वर साहारे यांनी केले व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर माहिती अमितजी मोरांडे यांनी दिली. या कार्यक्रमात गावातील गावकरी यांनी खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडले.