नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली:नंदलाल पाटील कामगते विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय साकोली येथील हिमांशू वंजयकुमार खोब्रागडे या विद्यार्थ्याने निट (NEET) परीक्षेत यश संपादन करून वैद्यकीय क्षेत्रात त्याची निवड झाली, त्याबद्दल विद्यालयाचे वतीने हिमांशूचा सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक के.एस.डोये सर प्रमुख अतिथी सौ.आर बी कापगते मॅडम, प्राध्यापिका सौ.एस एन गहाणे मॅडम, प्राध्यापक बी.पी.बोरकर सर व इतर मान्यवर उपस्थित होते. हिमांशू खोब्रागडे यांच्या पुष्पगुच्छ व रोख रक्कम 11 हजार रुपये देऊन सत्कार करण्यात आला तसेच प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलाला प्रोत्साहन देणाऱ्या हिमांशूच्या वडिलांचा ही यावेळी सत्कार करण्यात आला. हिमांशू वंजयकुमार खोब्रागडे या विद्यार्थ्याने नीट(NEET)परीक्षेत 720 पैकी 650 गुण प्राप्त करून त्याची वैद्यकीय क्षेत्रात निवड झाली. घरची परिस्थिती बेताची एक एकर शेती.वडिलांचा व्यवसाय म्हणजे मोलमजुरी करणे, आई गावागावात जाऊन बांगड्या विकून आपल्या प्रपंचाचा गाडा चालवित असे , अशा कठीण परिस्थितीत आजच्या महागड्या शिकवणी वर्ग हिमांशू लावणार तरी कसा? परंतु हिमांशुने मनात ठरवलं बनायचे तर डॉक्टर? ध्येयवेडा हिमांशू स्वस्थ बसणार तरी कसा ? अशातच त्याने कोणत्याही प्रकारची शिकवणी वर्ग न लावता घरीच अभ्यास करून त्याने जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेऊन यश प्राप्त केला.
हिमांशू याने सत्कार समारंभ प्रसंगी उत्तर देतांना आपण प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत आपण नीट(NEET) पर्यंतचे आपले ध्येय कसे पूर्ण केले ते सांगितले, तो पुढे म्हणाला की, आपले ध्येय साध्य करत असताना अनेकजण चुकीच्या सल्ला देऊन आपल्या ध्येयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत असतात. पण आपण सावध राहून निश्चयाने आपला मार्गाने चालत राहिलो तर नक्कीच यशस्वी होतो ,असे हिमांशू म्हणाला.
कार्यक्रमाचे संचालन आर.व्ही.दिघोरे तर आभार प्रदर्शन डि. डि. तुमसरे यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वीते करिता विद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.