पारशिवनी:- तालुक्यात एकुण 9 जनावरांमध्ये लम्पी रोगाचे चिन्ह आढळून आले आहे.लम्पी आजाराचा विळखा आता घट्ट होत असल्याचे पहायला मिळत आहे.
काही जनावरांमध्ये या लम्पीसदृश आजाराने बाधित जनावरे आढळून आली आहेत.परंतु आता पर्यत पारशिवनी तालुक्यातील साटक गावात दोन व बखारी गावात दोन,कान्हादेवी टेकाडी येथे तीन बैल व काद्री येथे दोन गाईना लंम्पीचे लक्षण आढकुन आले आहेत.यामुळे प्रशासनाने खबरदारी उपाय सुरू केले.
बाधित जनावरे मिळालेल्या भागातील बुधवार पर्यंत 5968 गाई व बैलाचे लशीकरण करण्यात आले.सोमवारी 1230 गाईबैलाच्या कोठ्यांची फवारणी करण्यात आली आहे.
बुधवारला कन्हान व कान्हादेवी टेकाडी येथे 2020 लशीकरण लशीकरण करण्यात आली असून 180 गाईचे गोठ्यांना जंतु नाशक फवारणी करण्यात आली.
बुधवारला कान्हादेवी टेकाडी गावात तपासणी केली असता पुन्हा एक बैलाला लंपी रोगाचे लक्षण आढळुन आले आहे.
कान्हा देवी टेकाडीतुन 3 पशु व कांद्री येथे दोन गाईना लम्पी आजाराचे लक्षण आढळुन आले असून त्याचे संपल तपासणी करीता पाठविण्यात आले आहे. गुरुवारला दहेगाव जोशी पशु चिकित्सा केन्दा अंतर्गत कान्हादेवी टेकाडी,सकरला,पेढरी,मोगरा येथे तर कन्हान पशु चिकित्सा केन्दा अंतर्गत कन्हान,सिहोरा,गऊ हिवरा , खंडाळा, जुनी कामठी, चांपा, या गावी फवारणी करणार व तपासणी करून लशीकरण करण्यात येणार असल्याची माहीती तालुका पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश ठाकुर,डॉ. कुबडे,डॉ. प्रिती वाळके यांनी दिली.
कन्हान विभागातील कन्हान पशु वैद्यकीय चिकित्सालय येथे व सिहोरा येथे पशु तपासणी करण्यात येणार आहे अशी माहीती कन्हान येथील पशु चिकित्सक डॉ. प्रिती वाळके यांनी माहीती दिली .
तालुकाचे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी संबंधित शेतकर्यांकडे पोहोचले.असल्याचे पशुसंवर्धन विभातील तालुका अधिकारी डॉ. गणेश ठाकुर यांनी सांगितले.कन्हान विभागातील डॉ. प्रिती वाळके,सह पारशिवनी तालुका व कन्हान , दहेगाव जोशी विभागातिल पुर्ण टिम तसेच अधिकारी कर्मचारी हजर राहणार आहे.
जिथे पशुना लम्पी रोणाचे लक्षण आढळूण आली त्या सर्व ठिकाणी गोठ्यात फवारणी , लशीकरण करण्यात येणार असल्याची माहीती तालुका पशुवैधकिय अधिकारी डॉक्टर गणेश ठाकुर,कन्हान विभागातिल डॉ. प्रिती वाळके, दहेगाव जोशी विभागातील डॉ. कुबडे यांनी दिली.