सतीनदीचा खचलेल्या रपट्याचे तातडीने बांधकाम करा :- उल्हास देशमुख…

     राकेश चव्हाण 

तालुका प्रतिनिधी कुरखेडा 

कूरखेडा :- मागील दोन महिण्यापूर्वी खचलेला सतीनदीचा रपट्यामूळे या मार्गावरील वाहतूक ठप्प पडत नागरीकाना १५ ते २० कीलोमीटर अधिकचा फेरा घालावा लागत आहे.

        विद्यार्थी,रूग्ण,तसेच नागरीकाना मोठा शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.सद्या पावसाचा वेग मंदावत नदीचा पाण्याचा प्रवाह कमी झालेला आहे,त्यामूळे संबंधित यंत्रणेने खचलेल्या रपट्याची तातडीने पूनर्रबांधणी करीत नागरीकाना दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष उल्हास देशमुख यानी केली आहे.

              तालूका मूख्यालयाला ग्रामीण भागाशी जोडणारा शहराचा सतीनदीवरील पूलाला तोडत नविन पूलाचे बांधकाम सूरू आहे.येथे वाहतूकीस खोळंबा निर्माण होऊ नये म्हणून पूलाचा बाजूनेच रपटा तयार करण्यात आला होता.

       मात्र,हा रपटा पहिल्याच पावसात वाहून गेला.यावेळी रपटा दूरूस्ती करीता संबंधित यंत्रणेकडून प्रयत्न करण्यात आले होते.पण त्यावेळी पावसाचा जोर अधिक असल्याने व नदीत पाण्याचा प्रवाहा जोरात असल्याने रपटा दूरूस्ती शक्य झाली नाही.

         मात्र,सद्या पावसाने उसंत घेतल्याने प्रवाह मंदावलेला आहे. यावेळी बांधकाम यंत्रणेने तातडीने या खचलेल्या रपट्याची पूनरबांधणी करावी व नागरीकाना दिलासा द्यावा या ठिकाणी आज गूरूवार रोजी उल्हास देशमुख यानी भेट देत बांधकाम प्रोजेक्ट मेनेजर जावेद शेख यांचाशी चर्चा सूद्धा केली व ब्रम्हपूरी येथील भूतीनाल्यावरील खचलेल्या रपट्याची याच बांधकाम कंपनीने पाण्याचा प्रवाह कमी होताच दूरूस्ती केली.

       त्यामूळे तातडीने येथील खचलेला रपट्याचे बांधकाम सूरू करण्याची मागणी केली.त्यानी सूद्धा लवकरच येथील बांधकाम सूरू करण्यात येईल असे आश्वासन दिले.